नवीन लेखन...

इये मुंबईचिये नगरी.. उत्तर रंग (२०१०)

मुंबईची कथा आणि व्यथा सांगणारी ही कविता श्री द्वारकानाथ शंकर उर्फ जयंत वैद्य यांनी सर्वप्रथम १९८२ साली लिहिली. जसजसा काळ पुढे गेला तसे संदर्भ बदलले, मुंबईसुद्धा बदलली. या कवितेचा पूर्वरंग १९८२ मध्ये तर मध्यरंग १९९५ मध्ये लिहिला गेला. आता लिहिलेला हा उत्तररंग मुंबईची व्यथा जोरकसपणे मांडतो आहे.

व्यवस्थापन सल्लागार असलेले श्री वैद्य हे अवघे पाउणशे वर्षाचे तरुण आहेत. त्यांचे नजिकचे मित्र त्यांना DS या टोपणनावाने संबोधतात.

आपण या कवितेचा पूर्वरंग वाचला नसल्यास प्रथम तो वाचावा. तसेच मध्यरंग वाचण्यासाठी येथे क्लिक करावे.

उत्तररंग ( २०१० )

सन १९९२ साली सोडोनी मुंबई नगरी
स्थिरावलो ठाणेशहरी जी जणू मुंबईची उपनगरी ।।१।।

ठाणे नगरी असे मनोहर अनेक तलाव करिती सुंदर
तरी न विसरे मुंबई नगर जिथे राहिलो निरंतर ।।२।।

म्हणून वाटले फिरुन यावे मुंबापुरीस भेटुन यावे
पुराण्या स्मृतीस जागृत करावे नवी हालत जाणण्या ।।३।।

अहो काय आश्चर्य नवल दाराशी खडे दिंडीद्वार
म्हणे द्यावे प्रवेश टोल मुंबा पुरीस भेटण्या ।।४।।

भरले एकुण रुपये तीस ओलांडली मुंबईची वेस
प्रथम संतोषी मातेस दंडवत घातला ।।५।।

पुढे सरकलो मुलुंड गावी शोधु लागलो पुराणी लेणी
जॉनसनचे सुंदर प्रांगण रॉलिज् पंख्यांचे अंगण ।।६।।

न दिसे मजला जुन्या फॅक्टरी खास उभे तेथे आज प्रचंड शहरी मॉल
भरभरुनी देती वस्तु स्वस्त एका वरती दोन जास्त ।।७।।

कुठे हरवले परळचे मजदूर त्यांची पोरे झाली आयटीचे टीचर
गिरगाव दादरचे बाबू लोक परदेशी फिरावले ।।८।।

जे राहिले अजुन मुंबईत रमती वातानुकुलित दफ्तरात
बॅंकेत किंवा परदेशस्थ संस्थांमध्ये समस्थ ।।९।।

काही झाले शाळेत मास्तर काही रमले सिनेमात अॅक्टर
सिंगर किंवा प्रमोटर जसे ज्याला जे सापडे ।।१०।।

मुंबापुरीचा तुफान वेग लोकलसेवेचा, मेट्रोचा आवेग
मुंबईकर सदैव मग्न पुढे पुढेची झेपण्या ।।११।।

मुंबई नगरी सदैव जागृत पुरवी सकलांचे मनोगत
नर – नारी वा बालकांचे चित्त काळानुसार पुरवितसे ।।१२।।

असो असो हे मुंबई पुराण नाही इथे कोणी वैराण
सर्वसकल वरदाईनी दंडवत घाली तव चरणी ।।१३।।

मुंबई होई जगत नगरी शांघाय किंवा सिंगापुरी
जगातील सर्व नर – नारी सुखे नैव नांदती ।।१४।।

या नगरीची ख्याती आसमंती पांगळ्यास देई अखंडगती
म्हणून नमतो सार्थ मती लववूनी मस्तक भूमीवरती ।।१५।।

— द्वारकानाथ शंकर (जयंत) वैद्य

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..