साहित्य:- दोन कप मैदा, पाऊण कप रवा, अडीच कप साखर, १० अंडी, एक कप लोणी, तीन टेबलस्पून दूध, एक टेबलस्पून गुलाबपाणी, अर्धा कप रम किंवा बॅण्डी, एक टेबलस्पून बेकिंग पावडर, एक टीस्पून वेलची-जायफळ पूड, अर्धा कप प्लम, प्रत्येकी पाव कप बेदाणे, मनुका, काजू, बदाम, पिस्त्याचे तुकडे आणि पाव कप टुटी-फ्रुटी.
कृती:- मैद्यात बेकिंग पावडर घालून तीन वेळा चाळावं. सुक्या मेव्याचे तुकडे, प्लमचे तुकडे आणि टुटी-फ्रुटी केक करण्याच्या दोन ते तीन तास आधी ब्रॅण्डी किंवा रममध्ये भिजत घालावेत. मैद्यात रवा घालून चांगलं मिसळावं. लोणी फेसून त्यात साखर घालावी आणि पुन्हा फेसावं. अंडी फेसून ती लोण्याच्या मिश्रणात घालून पुन्हा फेसावीत. या मिश्रणात मैदा आणि रव्याचं मिश्रण थोडंथोडं घालून एकजीव करावं. ते चांगलं एकजीव झाल्यावर त्यात दूध, गुलाबपाणी, वेलची-जायफळ पूड आणि भिजवलेले सुक्या मेव्याचे तुकडे रम किंवा ब्रॅण्डीसह घालावेत. तयार मिश्रण केकटिनमध्ये ओतून गरम ओव्हनमध्ये १५० डिग्री सेल्सिअस तापमानावर ५० ते ५५ मिनिटं बेक करावं.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
Leave a Reply