साहित्य:- मैदा १ कप, बेकिंग पावडर १ चमचा, बेकिंग सोडा अर्धा चमचा, अमूल बटर पाव कप, पायनापल इसेन्स पाव चमचा, कन्डेन्स्ड मिल्क २०० ग्रॅम, पिठीसाखर १ मोठा चमचा.
सजावटीचे साहित्य : साखरेचे पाणी (पाक) पाऊण कप, फेटलेले क्रीम २०० ग्रॅम, पायनापल पिसेस १ कप, चेरी ८ ते १०.
कृती:- मैदा, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा हे तिन्ही साहित्य एकत्र करून तीनदा चाळून घेणे. एका बाऊलमध्ये बटर, पिठीसाखर आणि कन्डेस्ड मिल्क एकत्र करून कमीत कमी दहा मिनिटे फेटावे. हे मिश्रण हलके आणि फुगेस्तोवर फेटावे.
या मिश्रणात चाळलेला मैदा घालून हे मिश्रण परत एकदा १५ ते २० मिनिटांपर्यंत एकजीव होईपर्यंत फेटावे. वरील मिश्रणात सोडा वॉटर आणि पायनॅपल इसेन्स घालून परत एकदा १ ते दीड मिनिटे फेटून घ्यावे. हे मिश्रण ताबडतोब बटर लावून सावरलेला प्लॅस्टिक केकच्या साच्यामध्ये ओतून मायक्रोवेव्हमध्ये न झाकता हाय पॉवरवर, तापमानावर ४ ते ५ मिनिटे ठेवावे.
थंड झाल्यावर साच्यातून बाहेर काढून आडवा कापून घ्यावा. एका भांडय़ात एक कप पाणी घेऊन या पाण्यात १ चमचा साखर घेऊन मायक्रोवेव्हमधे ३ ते ४ मिनिटे उच्च दाबावर ठेवून साखरेचे पाणी तयार करून घेणे. मायक्रोवेव्हमध्ये हे भांडे झाकण न लावता ठेवावे. आडवा कापून घेतलेल्या केकचा खालचा भाग जो आहे त्या भागावर साखरेचे पाणी शिंपडावे. केकचा भाग ओला होईस्तोवर या केकवर फेटलेले क्रीम पसरवून त्यावर अननसाचे तुकडे ठेवून त्यावर परत एकदा क्रीम पसरवून कापलेल्या केकचा दुसरा भाग त्यावर ठेवावा. केकवर साखरेचे पाणी शिंपडावे. या केकवर पण क्रीम घालून सर्व बाजूने एकसारखे करून घ्यावे. या केकला अननसाच्या तुकडय़ांनी आणि चेरीने छान सजवून घ्या.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
Leave a Reply