साहित्य : साखर १ वाटी, तूप किंवा बटर १ वाटी, मदा १ वाटी, रम अर्धी वाटी, बेकिंग पावडर पाव चमचा, दूध आवश्यकतेनुसार, ड्रायफ्रुट्स अर्धी वाटी.
कृती : केक बनविण्याच्या १ महिन्यापूर्वी ड्रायफ्रुट्स रममध्ये भिजवून ठेवावे. जेव्हा केक बनवायचा आहे तेव्हा मदा व बेकिंग पावडर एकत्र करून चाळणीने चाळून घेणे. त्यात रममध्ये भिजवत ठेवलेले ड्रायफ्रुट्स मिक्सरमध्ये बारीक करून घालणे. नंतर त्यात बटर आणि साखर घालून चांगल्या प्रकारे फेटून घेणे. शेवटी दूध घालून त्याचे मिश्रण तयार करावे. हे मिश्रण केक बनविण्याच्या भांडय़ात घालून १५ मिनिटे बेक करावे. वरून ड्रायफ्रुट्सने घालून सव्र्ह करावे
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
Leave a Reply