साहित्य:- कणीक अर्धा किलो, बटाटे अर्धा किलो, मीठ २० ग्रॅम, साखर ४० ग्रॅम, यीस्ट २० ग्रॅम, पाणी ६०० ग्रॅम, तेल वा वनस्पती तूप ८० ग्रॅम, बारीक चिरलेला लसूण १ चमचा.
कृती:- सर्वप्रथम बटाटे उकडून घ्यावे व ते कुस्करून एकजीव करावे. यीस्टला थोडय़ा गरम पाण्यात, साखर व कणीक घेऊन काचेच्या ग्लासात फुगण्याकरिता ठेवा. कणकेत बटाटय़ाचे मिश्रण, १ चमचा बारीक चिरलेला लसूण, मीठ, साखर, फुगलेला यीस्ट आणि पाणी मिसळून एकत्र करून घेणे. मिश्रण एकजीव झाल्यावर त्यात तूप घालून पुन्हा हे मिश्रण चांगले मळून घ्यावे व १ तास झाकूण ठेवावे. १ तासानंतर पुन्हा कणकेला मळून घ्यावे. ब्रेडच्या साच्याला तेल लावून त्यात मळलेला गोळा व बारीक चिरलेला लसूण पसरवा. ४५ मिनिटांनी कणीक फुलल्यावर २०० डीग्रीवर ३० ते ४० मिनिटे ठेवावे. कुकरमध्ये जर शिजवायचे असल्यास कुकरमध्ये रेती टाकून गरम करावे. नंतर ब्रेडच्या कणकेचा डबा आत ठेवून ३० ते ४० मिनिटे शिजू द्यावे.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
Leave a Reply