इ-पुस्तक स्वरुपात फक्त रु.९९/-
परदेशातल्या विमानतळावर उतरल्याबरोबर आपण अगदी नकळत तुलना करु लागतो …. आपली आणि त्यांची….
खरंच देश-विदेशातील माणसं हजारो मैलांवर रहात असतांना त्यांचे धर्म वेगळे असतील पण सवयी आणि लकबी सारख्या कशा? का खरंच भगवंताने एकाच पिंपातला बचक बचक “डीएनए” जगातल्या आपल्या सर्व बछड्यांना अगदी सारखा वाटला?
जागतिक बॅंकेचे परिवहन विषयातील सल्लागार असलेले अरुण मोकाशी झांझीबारमध्ये विश्व बॅंकेमार्फत “परिवहन विशेषज्ज्ञ” म्हणून दोन वर्षासाठी गेले असतांना त्यांनी लिहिलेली ही झांझीबार डायरी. त्यात त्यांनी वर्णिला आहे – आफ्रिकन लग्न सोहोळा आणि लगीनघाई, आफ्रिकन लोकांचे बिअर सेवन, सेरेगेटीतील प्राण्यांचे टान्झानिया-केनिया-टान्झानियाचे अदभूत स्थलांतर, बेटावर रहाणारा पण हवेत उडणारा कोल्हा, व्हिक्टोरिया नदीच्या पात्रातल्या आता निर्वंश होत चाललेल्या मासोळ्या, एक बलाढ्य कासव, जंगलातले जिराफ, आफ्रिकेत रहाणार्या भारतीयांचे गृहजीवन, समुद्रात बुडालेली एक अविस्मरणीय नौकाडुबी – अशा पंचवीस चित्तथरारक कथा !
वाचताना सतत वाटते की – अरे, आपण कितीतरी बाबतीत अगदी सारखे!
झांझीबार देशातले हे सोहोळे वाचतांना मग जाणीव होते, हा तर
त्यांचा आणि आपला …..
अवघा रंग एकचि झाला !!!
इ-पुस्तक स्वरुपात फक्त रु.९९/-
पुस्तकाचे नाव : झांझीबार डायरी
लेखक : अरुण मोकाशी
किंमत : रु.९९/-
पाने : १५०
प्रकाशक : मराठीसृष्टी
ISBN :
बाइंडिंगचा प्रकार :
वर्गवारी : प्रवास वर्णन, ललित लेखन
इ-पुस्तक स्वरुपात फक्त रु.९९/-
Leave a Reply
You must be logged in to post a comment.