अलीकडे,
काळ्या पाषाणखंडाचा
मला हेवा वाटू लागलाय
कारण-
पाषाणाला ह्र्दय नसते-
विदीर्ण व्हायची भीती नसते,
पाषाणाला मेंदू नसतो-
सडून जायची काळजी नसते…
अलीकडे,
अग्नीचाही मला
हेवा वाटू लागलाय
कारण-
अग्नीला स्वत:चे घर नसते-
जळून जायचे भय नसते,
अग्नीला स्वत:चा देह नसतो-
राख व्हायची चिंता नसते…
अलीकडे-
— विष्णू गोपाळ वडेर
Leave a Reply