मा.अशोक बापट यांनी मा.मंगेश पाडगांवकर गेल्यावर वाहीलेली भावपूर्ण श्रद्धांजली.
वर्षांच्या शेवटी जाता जाता दु:ख देऊन गेलात तुम्ही पाडगांवकर काका!
आम्ही तुम्हाला विसरूच शकत नाही!
तुम्ही आम्हाला ‘शतदा’ प्रेम करायला शिकवलंत!
तुम्ही आम्हाला ‘तुमचं आमचं प्रेम सेम असतं’ हे शिकवलंत!
तुम्ही आम्हाला ‘झोपाळ्यावाचून’ झुलायला शिकवलंत!
तुम्ही आम्हाला ‘स्मृति’ देऊनी जाणारी पाखरं दाखवलीत.
तुम्ही आम्हाला ‘भातुकली’च्या खेळामधली राजा आणि राणी दाखवलीत.
पण शेवटी तुम्ही अध्र्यावरती डाव मोडून निघून गेलात.
पुन्हा एकदा कविश्रेष्ठाला सलाम!
— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.लोकसत्ता
Leave a Reply