ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली. विश्वामित्राने देवांबरोबर झालेल्या तात्त्विक मतभेदांतून प्रतिसृष्टी निर्माण केली. सातासमुद्रापार दूर युरोपात विश्वाची निर्मिती कशी झाली याचं रहस्य शोधण्यासाठी प्रयोग चालू आहेत. त्यातून मर्म उलगडले की, काय सांगावे, दुसर्या एखाद्या विश्वाची निर्मितीही होईल.
जगभरात जेवढ्या म्हणून प्रेक्षणीय वास्तू आहेत त्यांची नक्कल करण्याचे प्रयत्न आतापर्यंत झाले व यापुढेही होतील. पर्यटकही एवढे चिकित्सक की, प्रतिकृतीला भेट देण्यापूर्वी मूळ शिल्प पाहून येणार. नंतर प्रतिकृती पाहून ती कितपत जमलेय याची नोंद घेणार.
हिंदुस्थानातल्या पर्यटकांची धाव प्रतिपंढरपूर, प्रतिबालाजी, प्रतिशिर्डी इथपर्यंतच आहे,पण जगभरात मात्र प्रतिकृतींना पर्यटक मोठ्या प्रमाणावर भेटी देतायत. सर्वाधिक लोकप्रिय प्रतिकृतींमध्ये गुआँग डॉंग, चीनमधील अल्पाईन व्हिलेज, मॅकलिन व्हर्जिनिया, अमेरिकेतील व्हाईट हाऊस, चीनमधील चॉंगकिंग येथील माऊंट रशमोर, ओडाईबा जपानमधील स्वातंत्र्य देवतेचा पुतळा आणि पोर्तुगालमधील येशू ख्रिस्ताचा पुतळा यांचा समावेश आहे.
डुप्लिकेटच्या जमान्यात लोकांनी देवांनाही सोडले नाही. पंढरपूरला पर्याय म्हणून प्रतिपंढरपूर शहाडला उभे राहिले, ‘शिर्डीस ज्याचे लागतील पाय’ म्हणून अनवाणी पदयात्रा करण्याचीही गरज उरली नाही. अगदी पुण्यात प्रतिशिर्डी साकारली आहे. प्रतिपंढरपूर, प्रतिबालाजी, प्रतिशिर्डी… आज एकमेवाद्वितीय असे काहीच नाही…..
अगदी आपले पंतप्रधान मोदींसारखी हुबेहूब दिसणारी व्यक्तीदेखील मुंबईत आहे. शेम टू शेम!
नीलेश भोसले यांचा संपूर्ण लेख वाचा…. दैनिक सामना मध्ये
— सुमंत व्यवहारे
Leave a Reply