भारताला स्वतंत्र्य मिळून ६५ वर्षे झाली पण पिण्याच्या पाण्या सारखा मुलभुत प्रश्न आम्ही सोडवु शकलो नाहीत तर असे स्वातंत्र्य मिळुन काय उपयोग झाला. ह्या काळात लोक संख्या ३० कोटी वरून आज १३० कोटी झाली .जस जशी वर्षे जातील लोकसंख्या वाढतच जाणार मग मुलभुत गरजा अन्न, पाणी व निवारा ह्याचे काय होणार ? ह्या सुविधा आपण कशा देणार ? येणार्या काळात जर नाही देऊ शकलो तर बळजबरीने हुसकावून घेण्याची प्रवृत्ती वाढीस लागेल ह्याला जवाबदार कोण असेल ? असे अनेक प्रश्न दुर्लक्षित झाल्याने कोणती आपत्ती आपल्यावर ओढवणार आहे ह्याची चिंता आहे का ? इतके सर्व स्पष्ट दिसत असताना आम्ही इतके उदासीन का आहोत ?
खालील दुव्या वर टिचकी द्या :
— श्री.मा.ना. बासरकर
Leave a Reply