नवीन लेखन...

एक समाधानी योगदान- —

सकाळची वेळ, अचानक चौघेजण माझ्या घरी आले. त्यांचे चेहरे परिचीत होते. त्यानी पुष्पगुच्छ व पेढ्यांचा पुडा आणला होता. ” सर आज आम्ही चौघेही रुग्णालयामधून निवृत्त झालो. आमची नोकरी केवळ तुमच्यामुळेच होती. तुमचा आमच्या जीवनामधील सहभाग आम्ही केंव्हाही विसरु शकत नाही. ” त्यानी ती भेट देत वाकून नमस्कार केला. मी भारावून गेलो. गहीवरलो. माझे डोळे पाणावले.

सहजगत्या घडलेले, सकारात्मक दृष्टीकोणातून केलेले एखादे काम, मानसामध्ये ऋणानुबंधाची भावना निर्माण करु शकतात. हे प्रथमच जाणले होते. माणस कांहीही करत नसतात. ईश्वर त्यांच्याकडून करुन घेतो, ह्याची मला त्या क्षणाला जाणीव झाली. छोटीशी कामे आपण करतो. परंतु जेंव्हा त्याची व्याप्ती महान होत जाते, त्यालाच नैसर्गिक योजना म्हणतात. सर्वांच्या चेहरय़ाकडे बघून मला तो ४० वर्षापुर्वीचा काळ आठवला.
एक प्रसंग १९७० च्या सुमारास घडला होता.आपल्या प्रलंबीत मागण्या धसास लावण्यासाठी महाराष्ट्र त्रितीय-चतूर्थ कर्मचारय़ानी संप पुकारला. जवळ जवळ ११ दिवस तो संप चालला. एकजुटीचे त्यात दर्शन घडले. बरय़ांच मागण्या मान्य झाल्या. त्या काळांत मी ठाण्याच्या मनोरुग्णालयांत उप प्रमुख (RMO) म्हणून कार्यारत होतो. माझे वरीष्ठ वैद्यकीय अधिक्षक होते. मध्यरात्रीला संप सुरु झाला. संपाची नोटीस आमच्या कार्यालयाला देखील प्राप्त झाली होती.
मनोरुग्णालयाचा भव्य परिसर, ५० हून जास्त वार्डस, त्यावेळी रुग्णसंख्या जवळ जवळ २००० होती. कर्मचारी संख्या ७०० च्या वर होती. सर्व व्यवस्थेचा भार फक्त १० आधिकारी व्यक्तीवरच होता.
सर्व बाबींची जसे रुग्णांचे जेवण खाण, औषधी ह्या आम्ही कांही कॉंट्र्याक्टर्स नेमुन तातडीने करुन घेतले. परंतु रुग्ण व त्यांतही मनोरुग्ण, म्हणून मणूष्यबळ ही प्राथमिक गरज होती. पोलिस खात्याने आम्हास २५ पोलिस कॉन्सटेबलस व एक इन्स्पेक्टर मदत म्हणून देऊ केले होते. हे सारे बिन अनुभवी तर होतेच, परंतु त्यांचा संबंध मनोरुग्णाशी प्रत्यक्ष येणार असल्यामुळे सर्वजण प्रचंड दबावाखाली वाटले. चांगलेच घाबरलेले होते. इन्स्पेक्टर तर म्हणाले ” आम्हाला चोरट्याना, गुंडांना वठनीवर आणण्यास सांगा. आम्ही सर्व ताकतीने करुं. पण हे मनोरुग्ण आमच्यासाठी भिन्न, अनिश्चीत असल्यामुळे एक प्रकारची भिती व शंका वाटते. तरी आम्ही तुमच्या मार्गदर्शनाप्रमाणे करुत. “रुग्णसंख्या, आणि कामाचा व्याप बघतां मणूष्यबळ अत्यंत कमी पडू लागले. एखादी दुर्घटना वेगळाच Turning Point बनु शकेल. ही भिती उत्पन्न झाली. शासनानी आम्हास ज्या गोष्टींची तातडीने गरज लागेल ते करुन घेण्याचे आदेश दिले होते. वरीष्ठांचा सतत संपर्क चालू होता.
सर्वात महत्वाची नी तातडीची गरज होती ती मनुष्य बळाची. आम्ही वरीष्ठांशी संपर्क साधला. व त्यांना कमीतकमी १५० लोकांना मदतीसाठी तात्पूरते ( हंगामी ) घेण्याची परवानगी घेतली. हाती वेळ थोडा. मी स्वतः लगेच आनंद नगर, समतानगर, भिमनगर, वर्तक नगर, लोकमान्य नगर ह्या त्या काळातल्या कामगार वस्त्यामध्ये गेलो.मनोरुग्णालयासाठी मदत करणारय़ा व्यक्तींची रोजंदारीने गरज असल्याचे कळविले. बघता बघता बातमी सर्वत्र पसरली आणि कामगार स्वयंसेवकाची रांगच लागली. आम्ही त्यावेळी बहूतेकाना मदतीसाठी घेतले. ग्रुप ग्रुप करुन वेग वेगळ्या वॉर्डसाठी नेमले.
ठराविक चाकोरीबद्ध व रुग्णांची शारीरिक काळजी घेण्याची जबाबदारी त्याना दिली. सतत मार्गदर्शन करीत गेलो. आधिक्षक स्वतः वरीष्ठांशी व सरकारशी संपासंबंधीत सल्लामसलत व Up-Dated Information and getting guidance ह्यात व्यस्त होते. उप प्रमुख ह्या नात्याने मी व माझे सर्व सहकारी यांनी रुग्णालय, रुग्ण आणि सर्व स्थानीक कामे सांभाळली. अतिशय धावपळीत परंतु सर्व शिस्तशीरो संपाचा काळ गेला.
संप संपला. बरय़ाच मागण्या मान्य झाल्या. त्याच वेळी माझ्या हे लक्षांत आले की संपकाळांत आम्हास जवळ जवळ १२५ बाहेरच्या तरुण कामगारांनी खूप मदत केली होती. एकदम नविन व तथाकथीत मनोरुग्णाच्या अपरिचीत भयानक वातावरणांत हे सर्व लोक आपले जीवन घोक्यांत घालून रात्रंदिवस मनोरुग्णासाठी कष्ट करीत होते. रात्र रात्र जागून काढल्या. जे नियमीत कामगार रुग्णसेवा करीत होते, त्यापेक्षाही तसूभर जास्त सेवा ही नविन मंडळी उत्साहाने करीत असल्याची जाणीव मला झाली होती.
त्या वेळी हे काम मजवरच वरिष्ठाकडून सोपविण्यात आले होते. त्यांत संपस्थितीचा सर्व आढावा रिपोर्ट तयार करणे व तो त्वरित संबंधीत अधिकारय़ाना वा सरकारला मिळेल हे बघत होतो. मी स्वतः त्या वेळची संप परिस्थिती, तत्कालीन व्यवस्थापना आणि विषेशकरुन हंगामी आणलेल्या सर्व कामगार संबंधीची अमुल्य मदत कार्य यांचे वर्णन सुद्धा होते. ह्याच वेळी एक महत्वाची नोंद व टिपणी केली गेली. ह्या सर्व हंगामी मदत करणारय़ा कामगाराना त्यांचे इनाम म्हणून शासनांत समावून घ्यावे. मी माझ्या आढावा रिपोर्टच्या प्रति वरिष्ठा बरोबर मंत्रालयांत स्थानिक आमदारामार्फत पाठपुरावा केला.
सर्व हंगामी कामगारांचे नशिब चांगले होते. सरकारने स्पेशल नोटीफिकेशन काढले. मनोरुग्णालयांत संपकाळांत मदत करणारय़ा कामगारांना शासकिय नोकरीमध्ये समावून घेण्याचा निर्णय घेण्यांत आला. तसा आदेश आमच्या रुग्णालयास प्राप्त झाला. ज्या कामगारांनी त्या काळांत मदत केली, त्यांची त्वरित वैद्यकीय तपासणी व पाठविलेला नमुना फॉर्म भरुन सादर करण्याचे सांगण्यात आले होते. कामगारांची तपासणी, छाननी. व निवड ही कामे मजवरच सोपवली गेली. आम्ही दोन दिवसांतच सर्व सोपस्कार पुर्ण केले व १०१ हंगामी कामगारांचा अहवाल संबंधीतांकडे पाठविला. थोड्याच दिवसांत सर्वांच्या नेमणूकांचे शासनाचे पत्रक मिळाले.
मी एक अत्यंत साधा व दुय्यम दर्जाचा ( त्या वेळी ) वैद्यकीय आधिकारी, परंतु केवळ निर्माण झालेल्या आपत्तीजनक परिस्थितीमध्ये एकाग्रतेने लक्ष देऊन, एक वेगळीच वातावरण निर्मीती करुं शकलो. कर्मचारय़ांचा संप, मनोरुग्णालयातील सेवा विस्कळीत होणे, प्रचंड संख्येनी असलेले मनोरुग्ण, मणुष्य बळाची आपत्तीजनक गरज, निरनिराळ्या कामगार वस्त्यामधून स्वतःजाऊन बोलावून आणलेले कामगार, त्याच्याकडून घेतलेली सेवा, आणि अत्यंत महत्वाचे म्हणजे त्या कामगारांचा शासकीय सेवेत कायम समावेश होण्यासाठी स्थानिक आमदारामार्फत यशस्वी प्रयत्न हे मी माझ्या जीवन प्रवाहांत केंव्हाच विसरणार नाही.
हीच ती मनोरुग्णालयामधली चार कामगार वर्ग मंडळी, तो दिवस केंव्हाच विसरु शकत नव्हती, ज्याना मी जाऊन बोलावून कामासाठी नेले होते. त्यांचे आणि अशाच इतर १०१ जणांचे जीवन त्या रुग्णालयाच्या वातावरणात रुजले, फुलले, आणि फळले होते. एक निमित्य वा ईश्वरी हस्तक म्हणा मी फक्त बिया घेतल्या व योग्य जमिनीत पेरल्या. शेवटी झाडे आपल्याच पद्धतीने वाढतात व फोफावतात. त्या १०१ जणांचे रोपण हेच माझे समाधानी योगदान नव्हे कां ?डॉ. भगवान नागापूरकर9004079850

bknagapurkar@gmail.com

— डॉ. भगवान नागापूरकर

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..