जेवणात अथवा खाण्यासाठी आपण कोणते तेल वापरतो यावरही आपले आरोग्य अवलंबुन असते. आजकाल जेवण बनविण्यासाठी कोणते तेल वापरावे याबद्दल बहुतेक जण जागरुक असतात. अगदीच डॉक्टबरांच्या सल्ल्याने नाही तर सर्वसाधारण माहिती घेऊनच आज तेलाचा वापर केला जातो. ज्या तेलामध्ये फॅट्स कमी अथवा कॅलरिज कमी अशा तेलाचा वापर करण्याकडे सर्वांचा कल असतो. नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनात असे लक्षात आले आहे की, ऑलिव्ह ऑईल हे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहे. ऑलिव्ह ऑईल शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी तर करतेच याशिवाय रक्तषदाबाची पातळीही आटोक्याशत ठेवण्यामध्ये ऑलिव्ह ऑईल लाभदायक ठरते. दिवसेंदिवस लोकांना ऑलिव्ह ऑईलचे आरोग्यासंबंधीचे महत्व पटताना दिसत आहे. या दोन महत्वाच्या फायद्यांबरोबरच ऑलिव्ह ऑईलमुळे आणखीही अनेक फायदे होतात. ऑलिव्ह ऑईलमुळे त्वचा तुकतुकीत होते. ऊन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सनबर्न होऊ नये यासाठीही हे फायदेशीर आहे. केस सिल्की आणि मऊ बनविण्यासाठी, त्वचेवर असलेले स्ट्रेच मार्क्सा घालविण्यासाठी, डोक्याकतील कोंड्यापासून मुक्तीन मिळवण्यासाठी अशा अनेक गोष्टींमध्ये ऑलिव्ह ऑईल उपयुक्तस ठरते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply