जुलै महिन्यात हॉस्पिटलच्या बेड वर मनात आलेले विचार….
हक्काची गाय आणली
पुढ्यात चारा टाकला
तिने भरपूर दूध दिले.
सखी, भार्या, माता
कर्तव्य चोख बजावली.
चाऱ्याच्या बदल्यात कर्तव्य
त्यात कसले आले प्रेम
माझा शुद्र पुरुषी विचार.
त्या दिनी हॉस्पिटल मध्ये
दोन्ही हातानी मला
बेड वर बसविले.
डोकावुनी तिच्या डोळ्यांत पाहिलं
तिथे दिसले केवळ
निखळ निरागस प्रेम.
स्वत:ची लाज वाटली
का ओळखू शकलो नाही
प्रेम तिचे?
थरथरत्या हातानी
तिचा हात घट्ट पकडला
कापऱ्या आवाजात म्हणालो
भीती वाटते मला.
खंबीर आवाजात ती म्हणाली
काही नाही होणार तुम्हास्नी
मी आहे ना.
त्या क्षणी ती मला
यमराजाशी झुंज देणारी
सावित्री सम भासली.
प्रेमाच्या माणसांसाठी
सर्वस्व अर्पण करणारी
संसारात सुखाचे
रंग भरणारी.
खरोखरीची
कामधेनूच ती.
— विवेक पटाईत
Leave a Reply