१)गाईचे तुप:
बुद्धि,कांती,स्मृती,धारणाशक्ती वाढविते,स्त्रोतसांचे शोधन करते,वातनाशक,स्वर चांगला ठेवते,पित्तनाशक,पुष्टीदायक,भुक वाढविते,वृष्य,आयुष्यकारक,गोड असून सर्व तुपांत श्रेष्ठ आहे.हे विषनाशक,डोळ्यांना हितकर,रसायन असून आरोग्यदायक आहे.
२)म्हशीचे तुप:
धारणाशक्तीवाढविणारे,सुखदायक,
कांतीवर्धक,कफवातनाशक,शक्तिवर्धक शरीरवर्ण सुधारणारे,मुळव्याध नाशक,भुक वाढविणारे व डोळ्यांसाठी हितकर आहे.
३)शेळीचे तुप:
भुक वाढविते,डोळ्यांनाहितकर,बलवर्धक,
खोकला,दमा कमी करणारे,पचायला अत्यंत हल्के असते.
(क्रमश:)
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:
९९६०६९९७०४
Leave a Reply