आपण मसालेवर्गाची संपूर्ण माहीती पाहिली आता आपण वळूयात ब-याच मंडळींना न आवडणारा खाद्य गट म्हणजेच पालेभाज्या.
हा विषय घेणार हे एकूनच ब-याच मंडळींनी नाकं मुरडली असणार ह्यात शंकाच नाही.
लहान मुलांना देखील फारशी न आवडणारी आणी आयुर्वेद देखील सांगतो ८ दिवसातून फक्त एक ते दोन वेळेसच हि खावी.
ह्या पालेभाज्या देखील औषधी गुणधर्मयुक्त असतात बरेका त्यामुळे आजपासून आपण काही दिवस किचन क्लीनीक मंध्ये भाजीची मोहीम राभविणार आहोत बरे का!
आता सुरूवात करायची ना? चला तर मग पहिली भाजी पाहूयात.
पालेभाजी – आंबट चुका
हि भाजी प्रामुख्याने देशावर उगवते.ह्याचे झाड हातभर उंच असते.पाने कोमल असतात. चवीला आंबट असते.हि उष्ण असते त्यामुळे शरीरात वात कमी करते आणि कफ पित्त वाढवते.
आता हिचे औषधी उपयोग पाहूया:
१)पानांचा लेप गांधीलमाशीचा दंश झालेल्या भागी व सुजेवर करावा.
२)अपचना मध्ये जेवणाआधी तासभर चुका भाजी,आले,कोथिंबीर व कांदा घालून सूप करावे व ते प्यावे.
३)तोंड कोरडे पडणे,तोंडास चव नसणे,मुख दुर्गंधी ,दांतदुखी मध्ये चुक्याच्या रसाने गुळण्या कराव्यात.
४)चुका रस १ चमचा + कांद्याचा रस १ चमचा हे मिश्रण चामखीळांवर लावावे फायदा होतो.
५)गजकरणावर चुक्याच्या पानांचा रस लावावा.
हि भाजी अतिप्रमाणात खाल्ल्यास संडासला पातळ होते.
— वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply