बालकांमध्ये असलेले कुपोषण दूर करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. शहरी व ग्रामीण भागातही कुपोषण श्रेणीत असलेल्या बालकांना पोषण आहार पुरविण्याचा प्रभावी कार्यक्रम सुरू आहे. कुपोषित बालकांना ‘अमरावती मिक्स’ या नावाने तयार करण्यात आलेल्या आहारात शेंगदाणे, चणे,
गूळ, कडधान्य यांचे मिश्रण तयार करण्यात येते. यात १४०पेक्षा जास्त कॅलरी आहेत आणि हा संपूर्ण आहार आरोग्य केद्राच्या कर्मचार्यामार्फत तयार करण्यात येतो. या आहारामुळे ३७ बालकांच्या वजनात वाढ झाली असून कुपोषण श्रेणीतून बाहेर निघाली आहेत. ‘अमरावती मिक्स’ नावाने ओळखल्या जाणारा हा पोषण आहार मेळघाटातील बालकांनाही उपयुक्त ठरणार आहे. राज्याच्या आरोग्य विभागानेही अमरावती मिक्स हा प्रयोग अत्यंत प्रभावी असून संपूर्ण राज्यात राबविण्याचा निर्णय घेतला आहे.१५ जून २०१० पासून पोषण आहार केंद्राचा शुभारंभ येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात करण्यात आला आहे. हे केंद्र राज्यात पहिलेच असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीस्तक डॉ. सी. एल. सोनकुसरे यांनी दिली. अमरावती मिक्स या नावाने हा पोषण आहार कुपोषीत बालकांना दिला जात आहे. शेंगदाणे, चणे, गूळ, कडधान्य यांचे मिश्रण पोषण आहार बनवित असून १४० पेक्षा जास्त कॅलरी यामध्ये आहे. एका बालकाला दर दिवशी ३५ ग्रॅम पोषण आहार दिला जात आहे. हा उपक्रम जिल्ह्यातील उपजिल्हा रूग्णालय, ग्रामीण रूग्णालय, तसेच जिल्हा स्त्री रूग्णालयात सुरू आहे. उपचारासाठी दाखल झालेल्या बालकांना अमरावती मिक्स पोषण आहार दिले जात आहे. या पोषण आहाराची प्रायोगिक तत्वावरील तपासणी मुंबई येथील डॉ. खडसे यांनी करून या आहाराला हिरवी झेंडी दिली आहे. अतिशय पौष्टीक असा हा पोषण आहार असून यामुळे बालकांची प्रकृती निरोगी राहण्यास मदत होत आहे. एवढेच नव्हे तर ३७ कुपोषणग्रस्त बालके या महिन
याभरात ठणठणीत झाले असून त्याची वजनवाढ झाल्याची माहिती डॉ. सोनकुसरे यांनी दिली. या आहारासाठी आरोग्य विभागाचा
प्रत्येक बालकामागे केवळ तीन रूपयाचा खर्च होत आहे. मेळघाटातून इर्विनमध्ये उपचारासाठी येणार्या आदिवासी रूग्णांना मार्गदर्शन व मदतीसाठी ‘मेळघाट सेल’ हा कक्ष सुरू करण्यात आला आहे. या सेलमध्ये चार कर्मचारी सतत कार्यरत आहेत. आदिवासींना उपचारादरम्यान इर्विनमध्ये कोणताही अडथळा येऊ नये हा यामागील उद्देश आहे. एचआयव्ही., एडस, मधुमेह, कुपोषण याबाबतची माहिती देण्यासाठी समुपदेशकाची लवकरच नियुक्ती केली जाणार असल्याचेही डॉ. सोनकुसरे यांनी सांगितले. अमरावती मिक्स या पोषण आहाराची राज्याच्या आरोग्य विभागाने स्तुती केली असून हा प्रयोग आता राज्यभर राबविला जात आहे. स्थानिक स्तरावर निर्माण करण्यात येत असलेल्या पोषण आहार आदिवासी भागातील बालकांच्या पसंतीला उतरला आहे. रात्री – अपरात्री डॉक्टर उपलब्ध होत नाही ही रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांची तक्रार लक्षात घेता जिल्हा सामान्य रूग्णालयात आता रूग्णांसाठी वाहन डॉक्टरांच्या दारी ही संकल्पना अस्तित्वात आणून संबंधित डॉक्टरांना थेट रूग्णालयात आणण्याचा नवा पायंडा रचला जात आहे. रूग्णसेवेबाबत टाळाटाळ करीत असलेल्या डॉक्टरांना या उपक्रमामुळे वेळीच अंकुश बसणार आहे.(सौजन्यः महान्यूज)
— बातमीदार
Leave a Reply