कोल्हापूर शहरातील महाद्वार रोडवर हे गणेशस्थान आहे. वाईकर यांच्याकडील विहिरीच्या दुरुस्तीत एक स्वयंभू गणेशमूर्ती सापडली. तेव्हा १८८२ साली कोल्हापूरचे छत्रपती आणि नागरिकांनी मिळून या मूर्तीची मंदिरात स्थापना केली. या मंदिराला खांब नसल्यामुळे त्याला बिनखांबी गणेशमंदिर असेही संबोधले जाते. मूळचे संगमेश्वरचे जोशीराव ज्योतिषी छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात येथे राहत असत.
जोशीरावांच्या शेजारी असल्या कारणाने या गणपतीला जोशीराव गणपती असेही म्हणतात. बिनखांबी गणेश मंदीर किंवा जोशीरावचा गणपती म्हणून प्रसिध्द असलेले हे मंदीर महाद्वार रोडवर आहे. या मंदिराचे मुख्य दोन भाग म्हणजे आतील गाभारा व त्यापुढील मंडप. गाभारा किंवा मंडप यांचे छत हे खांबाच्या आधाराविना उभारलेले आहेत हेच या मंदिराचे वैशिष्ट्य होय. मंडप सुमारे २५ फूट लांब व रुंद २५ फूट रुंद आहे. कळस गाभार्यावरच उभारलेला असून गणपतीची मूर्ती दगडी आहे.
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply