प्रथम खोकल्याचे औषध घेण्यापुर्वी आपल्याला नेमका कोणत्या प्रकारचा खोकला झाला आहे हे समजायला हव!
सर्दी खोकला ही जुळी भावंड असल्यासारखे असतात. सर्दी झाली की काही दिवसांनी खोकला होतोच. विविधप्रकारचे धुर- धुळ वा वास अत्तर रसायनांचे वास उदा. बॅगाॅन स्प्रे वगैरे, आईस्क्रिम, थंड पाणी, शीतपेय , सरबत यांच्यामुळे खोकला होतो. थंड वातावरणात रहाणे किंवा जाण एयरकंडीशनर चा वापर अती प्रमाणात करण यामुळे खोकला होऊ शकतो. भरभर जेवताना एखादा कण श्वासामार्फत गेल्यामुळेसुद्धा खोकला येतो.
अती व्यायाम, ओझ उचलण, अती चालण, अती जागरण, अती बोलण, दिवसा झोपणं, अति मैथुन करणं , अत्याधिक उपवास करण, वेळी अवेळी भोजन करण, कोरडे पदार्थ शिळे पदार्थ खाणे, अतिगोड, खारट, तेलकट आंबट असणा-या पदार्थामुळे खोकला होतो
वात- कफाचा खोकला
खोकला झाल्यावर तो कोरडा किंवा वातप्रधान असल्यास खोकताना फुटक्या भांड्याप्रमाणे आवाज येतो.ब-याच वेळा खोकला आल्यावर थोडा कफ पडतो व नंतर ढास थांबते. कफप्रधान म्हणजे ओला खोकला असल्यास खोकताना कफ सुटत असतो. तो वारंवार थुंकून टाकावा लागतो. बारीक ताप येण किंवा अंग दुखणं यासारखी लक्षण उत्पन्न होतात. आवाज बसन, खोकून तोंडाला कोरड पडण, थकवा जाणवणं यासारखी लक्षण दिसतात. कोरडा खोकला होतो त्याला डांग्या खोकला म्हणतात.
कफाच्या खोकल्यावरचा इलाज
1) सुंठ, मिरी, पिंपळी यांच चूर्ण मधामधुन चाटवावं.
2) सुंठ टाकुन उकळलेल पाणी प्यायल्याने खोकला व कफ कमी होतो
3) अडुळसा या वनस्पतीचा रस काढुन त्यात मध टाकून किंवा काढा करुन पाजल्यास खोकला कमी होतो
४) कोरफड भाजून त्यातील गर काढून त्यात मध मिसळून चाटवल्यास खोकला कमी होतो.
५) दालचिनी पावडर मधातून वारंवार चाटवावी त्यान खोकला कमी होतो
६) द्राक्षसव, कुमार आसव, अडुळसा सिरप, पिंपलासव ही बाजारात मिळणारी औषध उपयुक्त आहेत
७)छातीला तीळतेल व सैंधव एकत्र करुन माॅलिश करावी आणि गरम पाण्याच्या पिशवीन शेक द्यावा
८) दोन चमचे तुळशीचा रस, एक चमचा आल्याचा रस आणि मध अंस चाटण द्याव किंवा तुळशीचा काढा करुन प्यावा.
९) गवती चहाचा काढा करावा त्यात सुंठ, पिंपळी, दालचिनी, मिरी, आणि गुळ टाकुन एक कपभर काढा पाजावा
१०) वेलदोडे व लवंग भाजुन त्याची राख मधातून चाटवल्यास कफाचा खोकला त्वरीत कमी होतो
कोरडा खोकला
उपाय
कोरडा किंवा वातप्रधान खोकला असल्यास
१) खोबरेल तेल, तीळाचे तेल किंवा सहचर तेल किंवा दोन- तीन चमचे गाईचे तुप गरम पाणी आणि चिमुठभर सैंधव मिठ अंस एकत्र करुन पाजल्यास खोकल्याची ढास त्वरीत कमी होते. तेल किंवा तुप हे या खोकल्यातील प्रभावी औषध आहे
२) रुईची फुल, पानं वाळवुन ती जाळुन त्याची राख करुन ठेवावी व ती राख एक चिमूट व मधातून किंवा तेलातून चाटवल्यास दमा त्वरित कमी होतो
३) सागाची पानं, पळसाची पानं, रुईची पानं, फुलं, आवळकाडी, जाळुन त्याची राख, त्रिफळा किंवा बेहडा, लवंग वेलदोडा गायीच्या शेणाची राख यांचा प्रभावी उपचार या खोकल्यावर होतो
४) डाळिंबाची साल उगाळून चाटवणं किंवा सालीचा काढा करून त्यात तुप आणि सैंधव मीठ टाकून दिल्यास कितीही खोकला असेल तरी तो तात्काळ थांबतो
५) हळद, सुंठ व गुळ एकत्र करुन त्याच्या बोरा एवढ्या गोळ्या करुन ठेवाव्यात व दर १०/१५ मिनटांनी चघळाव्यात*
६) कोरडा खोकल्याच प्रमाण अतिशय असल्यास तेलाची बस्ती म्हणजे एनिमा द्यावा तात्काळ उपयोग होतो
या लेखाचे लेखक वैद्य विनय वेलणकर हे ख्यातनाम आयुर्वेदाचार्य आहेत
( vd.velankar@gmail.com)
कमलाकर भोईटे यांनी आरोग्यदूत या WhatsApp ग्रुपवर पाठवलेला लेख.
08275275841
Leave a Reply