3 ऑगस्ट 2010 : कोलम्बोच्या पी. सरवनमुत्तू मैदानावर क्षेत्ररक्षणासाठी भारतीय संघ मैदानात उतरला तेव्हा 1967 सामन्यांचा इतिहास असलेल्या कसोटी क्रिकेटला सर्वाधिक कसोट्या खेळणारा नवा वीर मिळाला. 169व्या सामन्यात भारताच्या नावाने टोपी घालताना सचिन तेंडुलकरच्या मनात काय असेल?… स्टीव वॉचे 168 कसोटी सामने हा आता इतिहास झाला आहे.
15 नोव्हेम्बर 1989मधील पदार्पण ते आजचा सामना या प्रवासात भारतीय संघाने खेळलेल्या केवळ 14 कसोट्यांमध्ये सचिनचा सहभाग नव्हता. 1971नंतर आंतरराष्ट्रीय वर्तुळात पाऊल ठेवणार्या खेळाडूंमध्ये त्याची ही कारकीर्द सर्वाधिक मोठी आहे. पहिला सामना खेळल्यानंतर आपण कधी कसोटी खेळू असे वाटले नाही, असे सचिन म्हणतो. “हा प्रवास खूप झटकन झाल्यासारखा वाटतो. वेळ उडत उडत निघून जातो. तुम्ही त्याचा आनंद घेतला पाहिजे, ते एक वर्तुळ आहे. तुम्ही प्रत्येक वेळी अग्रस्थानीच असाल असे नाही पण प्रत्येक कठीण काळाने मला आणखी कष्ट घेण्यासाठी प्रवृत्त केले आहे,” असेही तो म्हणतो.
“मी एक स्वप्न जगतो आहे”, असे म्हणून सचिन सांगतो, “एवढे वर्षे आणि एवढे दौरे ह्या बाकीच्या गोष्टी घडतच राहतात. मी समाधानी आहे वीसहून अधिक वर्षांच्या या प्रवासावर….
नक्कीच वाचा.. `जागत्या स्वप्नाचा प्रवास’
Leave a Reply