जानिसार अख्तर म्हणजे उर्दूतील पुरोगामी चळवळीतील एक नज्मगी शायर. त्यांचा जन्म १८ फेब्रुवारी १९१४ रोजी झाला.रोमँटिक संवेदनशील मनोवृत्ती, तरल शब्दभांडार, गेय छंदांवर असामान्य प्रभुत्व, ग़ज़्ालीयतचे सखोल ज्ञान या दुर्मीळ प्रतिभेमुळे जानिसार अख्तर यांचे समग्र काव्य, अन्य समकालीन शायरांपेक्षा वेगळे होते. जान निसार अख्तर हे जावेद अख्तर यांचे वडील. जावेद अख्तर यांच्या जन्माच्या वेळी जान निसार अख्तर हे एका चित्रपटांसाठी गाणे लिहीत होते. त्यांत एक गाजलेला शेर होता. ‘लम्हा लम्हा किसी जादू का फसाना होगा’ या शेर वरून त्यांचे नाव ‘जादू’ ठेवण्यात आले होते व शाळेत नाव टाकताना ‘जादू’ च्या जवळपासचे नाव म्हणून ‘जावेद’ ठेवण्यात आले होते. जानिसार अख्तर म्हणजे उर्दूतील पुरोगामी चळवळीतील एक नज्मगी शायर. रोमँटिक संवेदनशील मनोवृत्ती, तरल शब्दभांडार, गेय छंदांवर असामान्य प्रभुत्व, गजलीयतचे सखोल ज्ञान या दुर्मीळ प्रतिभेमुळे जान निसार अख्तर यांचे समग्र काव्य, अन्य समकालीन शायरांपेक्षा वेगळे उठून दिसतं. त्यांना सामाजिक, राजकीय जाण परिपक्व होती. त्यांची ओळख उर्दूतील पुरोगामी चळवळीतील एक नज्मगी शायर अशी होती. त्यानंतर ‘घर आंगन’ या पती पत्नीच्या प्रेमातील प्रेयस छटांचं मोहक विश्लेषण करणाऱ्या ‘रुबाइयां’ संग्रहाचा हा संवेदनशील कवी. अन् मग आयुष्याच्या उत्तरार्धात रचलेल्या लक्षणीय प्रतिभेच्या गजल संग्रह ‘पिछले पहर’चा ग़ज़्ालकार.- ते म्हणजे जाँनिसार अख्तर. खरं तर चित्रपट रसिकांत जावेद अख्तरांचे स्थान काही असो उर्दू वाङ्मयविश्वात मात्र त्यांची ओळख अजूनही जाँनिसार अख्तर यांचा मुलगा अशीच आहे व तीच राहील. रोमँटिक संवेदनशील मनोवृत्ती, तरल शब्दभांडार, गेय छंदांवर असामान्य प्रभुत्व, ग़जलीयतचं सखोल ज्ञान या दुर्मीळ प्रतिभेमुळे जाँनिसार अख्तरांचं समग्र काव्य अन्य समकालीन शायरांपेक्षा वेगळं-उठून दिसतं. जाँनिसार अख्तरांनी युद्धकाळात ‘आवाज दो हम एक है’सारखे समर गीत लिहिले. थोडय़ा थोडक्या नव्हे तर तब्बल ८० चित्रपटांसाठी जाँनिसार अख्तरांनी गाणी लिहिली. ज्येष्ठ शायर निदा फाजली म्हणतात, फिल्मी दुनियेत दोन प्रकारचे शायर सापडतात. एक ते ज्यांना फिल्मी जग शायर बनवते. अन् दुसरे ते जे स्वत: शायर असतात अन् ते आपआपल्या काव्यसंग्रहासह फिल्म इंडस्ट्रीमध्ये येतात. जाँनिसार हे दुसऱ्या प्रकारचे शायर होते. १९४८ मध्ये ‘शिकायत’ या प्रथम चित्रपटासाठी गाणे लिहिण्यापूर्वी जानिसार यांचे ‘जाविदाँ’, ‘खाके-दिल’, ‘नजरे-बुताँ’ हे काव्यसंग्रह प्रकाशित होते. साहिर लुधियानवी हा मित्र असल्याने त्यांच्या काव्यावर ते परिक्षण करीत असत. साहिर हा अल्पप्रसव शायर तर जान निसार हे आशुकवी होते. साहिर हे चित्रपटसृष्टीत आपल्या डाव्या विचारसरणीच्या, प्रेमपद व विद्रोही काव्यामुळे चांगलेच लोकप्रिय होते. त्यामुळे त्यांना गीतकार म्हणून बरीच मागणी होती. मागणी तेवढा पुरवठा करणे शक्य न झाल्याने कदाचित आर्थिक विवंचनेतील मा.जाननिसार अख्तर यांनी अनेक जण म्हणतात त्याप्रमाणे साहिर यांच्या साठी घोस्ट राइटिंग केलेही असेल. ‘चित्रलेखा’ या चित्रपटातील ‘संसार से भागे फिरते हो’ या गीतांची भाषा नीरज शैलीची आहे. मा.जान निसार अख्तर यांची सामाजिक, राजकीय जाण परिपक्व होती. मध्यवयानंतर ते गजल-सृजनाकडे वळले अन् सत्तर-ऐंशी ग़जलात साहिर, मजरूह, कैफी, जाफरी मख्दूम यांना त्यांनी मागे सोडले. मा.जानिसार अख्तर यांच्या काव्याचा अन् ग़जलचा मूलभूत विषय म्हणजे प्रेम. पत्नी व प्रेयसी या द्वैतामध्ये त्यांनी एकरूपता आणली. ती एकरूपता मनाची शरीराची अन् विचारांची होती. मात्र ‘घर आंगन’ या रुबाई संग्रहात ते स्वत: पत्नीच्या भूमिकेतून प्रेमरंगाच्या विविध छटा शब्दबद्ध करतात. उर्दू ग़जलने वली, मीर, गालिब, फानी, यगाना , जिगर, फैज, नासिर, बानी अशी अनेक वळणे पाहिली. जान निसार अख्तर हे वेगळं वळण अधोरेखित केल्याशिवाय उर्दू गजलचा इतिहास अपूर्णच म्हणावा लागेल. एवढंच नव्हे तर त्यांनी संपादित केलेल्या ‘हिन्दोस्तां हमारा’ या मौल्यवान बृहद् उर्दू शायरीच्या संकलनामुळे, भारतीय संस्कृतीच्या प्रत्येक पलूला उर्दू साहित्यिकांनी गेली सातशे वर्षे किती आत्मीयतेने शब्दरूप दिलंय हे कळतं. रोमँटिक ग़जलचा हा पुरोगामी शायर फिल्मी जगतात उपेक्षित राहिला पण उर्दू काव्यरसिकांत अजूनही त्यांच्या आठवणी तेवत आहे. मा.जान निसार अख्तर यांचे निधन १९ ऑगस्ट १९७६ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०७१३३
संदर्भ.इंटरनेट / डॉ. राम पंडित
Leave a Reply