नवीन लेखन...

जेष्ठ मराठी अभिनेते राजा गोसावी

आपल्या नाचगाण्याच्या वेडापायी शाळेच्या चार इयत्ता कशाबशा पार पाडून राजा गोसावी यांनी मुंबई गाठली. त्यांचा जन्म २८ मार्च १९२८ रोजी साताऱ्यातील सिद्धेश्वर कुरोली येथे झाला.त्यांनी ऑफिस बॉय म्हणून मास्टर विनायकांच्या कंपनीत काम केले. दामुअण्णा मालवणकर हे त्यांचे गुरू. दामुअण्णांच्या प्रभाकर नाटय़मंदिरात ते प्रॉम्टरची नोकरी करत. याच कंपनीच्या ‘भावबंधन’ या नाटकाद्वारे मराठी रंगभूमीशी त्यांचे भावबंध जुळले ते कायमचेच. ‘अखेर जमलं’ या चित्रपटातील त्यांची भूमिका पाहून दिग्दर्शक राजा परांजपेंनी ‘लाखाची गोष्ट’ या चित्रपटात त्यांना घेतलं. हा चित्रपट त्यांच्या दृष्टीने लाख मोलाचा ठरला. ‘लाखाची गोष्ट’ हा चित्रपट पुण्याच्या भानुविलास थिएटरमध्ये प्रदर्शित झाला, तेव्हा तिकीट फाडणाराच चित्रपटाचा नायक असल्याचे पाहून प्रेक्षक चकीत झाले. ‘लाखाची गोष्ट’ प्रदर्शित झाला त्या वेळी मा.राजा गोसावी ‘भानुविलास टॉकीज’मध्ये बुकिंग क्लार्क होते. स्वत:च्या सिनेमाची तिकिटे स्वत:च विकत असत आणि काही वेळा त्यांनी ब्लॅकमध्ये विकली. जागतिक सिनेमा इतिहासातला हा अचाट प्रकार. ‘लाखाच्या गोष्टी’ची ही गोष्ट मा. राजा गोसावी पुढे अनेक काळ रंगवून सांगत असत. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये समजूतदार विनोदी अभिनेत्यांच्या यादीमध्ये मा.राजा गोसावी यांचा क्रमांक आघाडीवर होता. मा.राजा गोसावी वाढले पुण्याच्या सदाशिवपेठेत, त्यामुळे त्यांचा विनोद सुशिक्षित मध्यमवर्गीय असे. राजा गोसावींचा आवडता कलाकार म्हणजे हॉलिवूडचा डॅनी के! आपल्या सहजसुंदर अभिनयाने राजा गोसावी संपूर्ण पडद्यावर वावरत असत. त्यांच्यातील हजरजबाबीपणाची झलक चित्रपटाच्या पहिल्या फ्रेमपासूनच दिसत असे. एक सुंदर मराठी चित्रपट म्हणजे देखणा नायक, मध्यमवर्गीय नायिका, तिचे आई-वडील, चित्रपटाचे सुंदर शांत संगीत, गाणी हे सारे काही विलक्षणच असे. १९५० ते १९७० पर्यंतची दोन दशके मा.राजा गोसावी यांनी आपल्या अभिनयाने अक्षरश: गाजवली. जयश्री गडकर, स्मिता, रेखा, सीमा, नीलम अशी विविध नायिकांची साथ मा.राजा गोसावी यांना लाभली. अवघाची संसार, पैशाचा पाऊस, झालं गेलं विसरून जा, राजमान्य राजश्री, याला जीवन ऐसे नाव, बाप माझा ब्रह्मचारी, वाट चुकलेले नवरे, कामापुरता मामा, सुधारलेल्या बायका, दिसतं तसं नसतं, शेरास सव्वाशेर, श्रीमंत मेहुणा पाहिजे इत्यादी अनेक चित्रपटांतून वसंत पवार, सुधीर फडके, दत्ता डावजेकर, राम कदम यासारख्या लोकप्रिय संगीतकारांच्या सुंदर गाण्यांनी चित्रपटांना मजा आणली. मा.राजा गोसावी यांनी अडीचशे चित्रपटातून त्यांनी काम केले. केवळ विनोदी नव्हे तर गंभीर भूमिकाही त्यांनी केल्या. ‘हा खेळ सावल्यांचा’ या चित्रपटातील त्यांची खलनायकाची भूमिका विशेष लक्षात राहिली. मा.राजा गोसावींच्या अभिनयातील सहजता, मुद्रेवरील भाव व संवादफेकीचं अचूक टायिमग अगदी दाद देण्यासारखं होतं. त्यांच्या या गुणांमुळेच लोकांनी त्यांना भरघोस दाद दिली. त्यांच्या शंभराहून अधिक विनोदी चित्रपटात फार विविधता नसली तरी त्यांनी लोकप्रियता अफाट मिळविली. त्यांची ही लोकप्रियता पाहून १९५९ मध्ये वसंत पिक्चर्सचे निर्माते वाडिया यांनी ‘राजा गोसावींची गोष्ट’ या नावाचा चित्रपटच निर्माण केला होता. मुंबई दूरदर्शनवरील ‘रंगतरंग’ या कार्यक्रमात बोलताना मा.राजा गोसावी म्हणाले होते,‘‘माझ्या जीवनात पैसा हा योगायोगाने आला आणि भोगाभोगाने गेला! ‘लाखाची गोष्ट’ या चित्रपटाचे मला मिळाले अवघे पाचशे रुपये! परंतु, त्यातील एकही रुपया आजतागायत खर्च झालेला नाही. उलट माझ्या या जनता जनार्दन बँकेत लक्षावधी ‘टाळ्या व हशे’ जमा आहेत. म्हणूनच आडनाव ‘गोसावी’असले तरी रसिक मला विनोदाचा ‘राजा’ म्हणतात!’’ चित्रपटसृष्टीत यश मिळवूनही ते रंगभूमीला विसरले नाहीत. ‘सौजन्याची ऐशी तैशी’, ‘लग्नाची बेडी’, ‘प्रेम संन्यास’, ‘एकच प्याला’, ‘नटसम्राट’ ही त्यांची गाजलेली नाटके. मा.विनायकांचं ‘सहजतेचे हास्य स्कूल’चा खरा वारसदार असणाऱ्या मा.राजा गोसावींना पदरी वाक्य पेरण्याचं अगदी व्यसन होतं. आचार्य अत्र्यांच्या अनेक नाटकातही त्यांना हा मोह आवरला नाही, तर चित्रपटात कॅमेऱ्यासमोर अशा शेकडो ऑडिशन्स मा.राजा गोसावींच्या नावावर आहेत. १९९५ ला झालेल्या अखिल भारतीय नाटय़संमेलनाचे ते अध्यक्ष होते. नाटय़ परिषदेने ‘बालगंधर्व’ हा पुरस्कार देऊन त्यांच्या अभिनयाचा गौरव केला. मा.राजा गोसावी यांना मराठीतील ‘दिलीपकुमार’ म्हणत असत. मा.राजा गोसावी यांनी आपल्या सहजसुंदर अभिनयाने अचूक संवादफेकीने निखळ विनोद निर्माण करून जवळजवळ पाच तपे मराठी रसिकांवर अधिराज्य केले. मा.राजा गोसावी यांचे २८ फेब्रुवारी १९९८ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट

राजा गोसावीयांनी अभिनय केलेल्या चित्रपट व गाण्याची लिंक
रूपास भाळलो मी, भुललो तुझ्या गुणाला https://www.youtube.com/watch?v=qmXHU1m-5SA
अशी निशा पुन्हा दिसेल का https://www.youtube.com/watch?v=601Fy9v3DVk
मानसीचा चित्रकार तो https://www.youtube.com/watch?v=PP7XEtn4ljQ
‘लाखाची गोष्ट’ चित्रपट https://www.youtube.com/watch?v=AAXcdz0vg9c
‘चिमण्यांची शाळा’ चित्रपट https://www.youtube.com/watch?v=Yg4f1d87_2s

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..