आज १८ आक्टोबर
आज डॉ.अमोल कोल्हे यांचा वाढदिवस.
जन्म.१८ आक्टोबर १९८०
शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की, अभिनेता डॉ. अमोल कोल्हे यांची छबी डोळ्यासमोर उभी राहते. ‘राजा शिवछत्रपती’ या मालिकेतील शिवरायांच्या अप्रतिम भूमिकेमुळे अमोल कोल्हे यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली.
डॉ.अमोल कोल्हे यांचा जन्म पुण्याजवळील नारायणगाव येथे झाला. आठवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी तेथेच घेतले आणि मग पुढील शिक्षणासाठी ते पुण्यात आले. आपटे प्रशालेतून विज्ञान शाखेमधून त्यांनी १२वीपर्यंतचे शिक्षण घेतले. १०वी आण १२वीच्या निकालांत त्यांचा गुणवत्ता यादीत समावेश होता. पुढे ते एम.बी.बी.एस.ची पदवी घेण्यासाठी मुंबईला गेले आणि त्यांनी जी.एस. महाविद्यालयातून त्यांनी आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. डॉ. अमोल कोल्हे हे मराठीतील प्रसिध्द अभिनेते. स्टार प्रवाह या वाहिनीवरील ‘राजा शिव छत्रपती’ या ऐतिहासिक मालिकेपासून ते प्रसिद्धीस आले.
डॉ. अमोल कोल्हे यांच्या पत्नी डॉक्टर अश्विनी या वैद्यकीय महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक आहेत.
डॉ. अमोल कोल्हे हे एक प्रभावशाली वक्ते आहेत आणि ते सध्या शिवसेना या पक्षाचे सदस्य आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply