पाण्याला तर जीवन संबोधलं जातं, निरोग़ी आरोग्यासाठी संतुलित आहार, योग्य व्यायाम याचबरोबर भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. सकाळी अनशी पोटी तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्यास शारीरिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी अधिक फायदा होतो. आयुर्वेदानुसार तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी त्रिदोषहारक ( कफ , पित्त, वात) असते.त्यामुळे किमान ८ तास तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी नियमित प्यावे. तांब्याच्या नैसर्गिक जंतुनाशक गुणधर्मामुळे पाणी निर्जंतुक होते. पित्त, अल्सर किंवा पोटात ग़ॅसचा विकार होणार्यांतसाठी तांब्याच्या भांडात ठेवलेले पाणी पिणे अत्यंत हितकारी आहे. तांब्यातील जंतूनाशक गुणधर्मामुळे , पोटातील जिवाणूंचा नाश होतो ,जळजळ होण्याची समस्या कमी होते. पचनसंस्थेला चालना देण्याबरोबरच हे पाणी शरीरातील अतिरिक्त मेद कमी करण्यास मदत करते. शरीराला आवश्यक मेद शोषून घेतल्यानंतर चरबी वाढवणारे अनावश्यक मेद बाहेर टाकण्यास मदत करते. तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी अॅढन्टीबॅक्टेरीयल तसेच अॅणन्टीवायरल असल्याने दाह कमी करण्यास मदत होते. तांब्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते. या पाण्यातील अॅ न्टीऑक्सिडंट आणि नवीन पेशी निर्माण करण्याची क्षमता चेहर्यायवरील सुरकुत्या कमी करण्यास मदत करते. तसेच चेहर्याीवरील नवीन त्वचा निर्माण करण्यास मदत करते. हृदयरोग व रक्तदाबासारखे आजार आटोक्यात ठेवण्यास मदत करते. तांब्याच्या अॅवन्टीऑक्सिडंट घटकांचा ,कर्करोग जडण्याचे प्रमुख कारण असणार्याल शरीरातील फ्री-रॅडिकल्सशी सामना करण्यासाठी मदत होते. शरीरातील अनेक कार्य सुरळीत करण्यासाठी तांब्याचा उपयोग होतो. अगदी पेशींची निर्मीती करण्यापासुन ते पदार्थांतील आयर्न(लोह) व मिनरल्स शोषून घेण्यासाठी मदत होते. तांबे शरीरात मेलॅनीनच्या निर्मितीमध्ये मदत करते. तसेच त्वचेच्या पेशींच्या निर्मीतीत तांबे प्रमुख भुमिका बजावते. त्यामुळे रोज सकाळी तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्यास त्वचेचा पोत व आरोग्य सुधारण्यास मदत होते. तांब्यात दाह दूर करण्याची क्षमता असल्याने , संधीवाताच्या त्रासामुळे होणारी सांधेदुखी दुर होण्यास मदत होते. तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने शरीरातील थायरॉक्सिन हार्मोन संतुलित राहते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply