आज ६ नोव्हेंबर..आज चित्रपट दिग्दर्शक, पटकथा व संवाद लेखक मा.दिनकर द. पाटील यांची जयंती.
दिनकर द. पाटील यांचा जन्म ६ नोव्हेंबर १९१५ रोजी झाला.
‘राम राम पाव्हणं’ या चित्रपटापासून मा.दिनकर द. पाटील यांनी चित्रनिर्मितीत पाऊल टाकले. त्यांच्या ‘उदय कला चित्र’ व ‘दिनकर चित्र’ तर्फे नंतर त्यांनी ‘पाटलाचा पोर’, ‘तारका’, ‘मूठभर चणे’, ‘कुलदैवत’, ‘भैरवी’ अशा अनेक चित्रपटांची निर्मिती केली. दिनकर पाटलांनी आपल्या पन्नास वर्षांच्या कारकिर्दीत शंभरहून अधिक चित्रपटांचे लेखन व सुमारे चाळीस चित्रपटांचे दिग्दर्शन वा दहा अनुबोधपट चे दिग्दर्शन केले. साहित्यक्षेत्रातही त्याची कर्तबगारी उल्लेखनीयच होती. पाच नाटके, दोन एकांकिका संग्रह, चार कथासंग्रह, चार व्यक्तिचित्रांचे संग्रह, ‘रूपेरी पडदा’, ‘तंत्रमंत्र’ हे चित्रपटविषयक पुस्तक आणि ‘पाटलाचा पोर’ हे आत्मचरित्र अशी त्यांची ‘साहित्यसंपदा’ आहे. मा.दिनकर द. पाटलांच्या उमज पडेल तर , प्रेम आंधळं असतं व ते माझे घर या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार लाभले. त्यांना ग. दि. माडगूळकर पुरस्कार, जनकवी पी. सावळाराम पुरस्कार आणि व्ही. शांताराम पुरस्कार असे मानाचे पुरस्कार लाभले. चित्रपट महामंडळाच्या ‘चित्रभूषण पुरस्कारा’चेही ते मानकरी होते. मा. दिनकर पाटील यांचे २१ मार्च २००५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply