शरिरातील अवयव सारे, यंत्रावत् असती
आपल्यापरी कार्य करुनी, कार्यारत राहती
यंत्रामधल्या मुख्य गाभ्याला, आत्मा म्हणती कुणी
अविरत मिळे चैत्यन्य शरीराला, त्याचे कडूनी
अविरत मिळे चैत्यन्य शरीराला, त्याचे कडूनी
शुद्ध अशुद्ध संस्कार सारे, अवयवी घडती
त्याच रुपें आत्म्याकरवी, परिणाम तो होती
त्याच रुपें आत्म्याकरवी, परिणाम तो होती
खाणें शुद्ध पिणेशुद्ध विचार निर्मळ, पवित्र ते
संगम होता योग्य साऱ्यांचा, शुद्धीकरण घडते
संगम होता योग्य साऱ्यांचा, शुद्धीकरण घडते
उपास तापास करुनी कांहीं, शिणविती देहाला
हट्टयोग साधूनी कित्येक, दमविती शरीराला
हट्टयोग साधूनी कित्येक, दमविती शरीराला
देह असे साधन केवळ, प्रभूकडे जाण्याचे
साध्य होईल त्याच आधारें, इप्सित जीवनाचे
साध्य होईल त्याच आधारें, इप्सित जीवनाचे
खाद्यपाणी हे तर इंधन, असे शरीर यंत्राचे
अभावी त्याचे कसे चालेल, जीवन मग तुमचे
अभावी त्याचे कसे चालेल, जीवन मग तुमचे
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail – bknagapurkar@gmail.com
— डॉ. भगवान केशवराव नागापूरकर
Leave a Reply