नवीन लेखन...

पर्याय अॅसेट अॅलोकेशन फंड्सचा

भविष्यात लागणार्‍या निधीची गरज ओळखून त्याप्रमाणे आजच विविध पर्यायांमध्ये गुंतवणूक करण्याला अॅसेट अॅलोकेशन म्हणतात. पण, अॅसेट अॅलोकेशन करणे तेवढे सोपे नसते. अशा वेळी अॅसेट अॅलोकेशन फंड्स आपल्या मदतीस येतात. यात गुंतवणूकदाराला फारसा विचार करावा लागत नाही. त्यांच्या गुंतवणुकीचे निर्णय तज्ज्ञांद्वारेच घेतले जातात. असे असले तरी काहींचा या फंड्सना विरोध आहे.

आपल्या गुंतवणुकीची योजना यशस्वी व्हावी आणि आयुष्याच्या उत्तरार्धात हातात मुबलक पैसा खेळता रहावा म्हणून ‘अॅसेट अॅलोकेशन’ आवश्यक असल्याचे आपल्या डोक्यात कोरले गेलेले असते. परंतु, प्रत्यक्षात अॅसेट अॅलोकेशनची योजना तयार करायला गेल्यावर बर्‍याच अडचणी येतात. थडक्यात, अॅसेट अॅलोकेशन म्हणजे आपल्याला उतारवयात लागणार्‍या निधीची तयारी करण्यासाठी विविध प्रकारच्या गुंतवणुकींचा योग्य संगम साधून त्याची योजना आखणे. हे बोलायला सोपे असले तरी अशी योजना आखणे अनेकांना शक्य होत नाही. सर्वप्रथम आपल्याला जीवनाचे ध्येय ठरवावे लागते. म्हणजेच आपल्याला निवृत्तीनंतर किती पैसा लागणार आहे हे निश्चित करावे लागते. त्यानंतर गुंतवणुकीच्या विविध पर्यायांचा अभ्यास करून त्यांची योग्य निवड करावी लागते. गुंतवणुकीच्या प्रकारांमध्ये काही बदल करायचे असल्यास पुन्हा सर्व योजनेचा पुनर्विचार करावा लागतो. त्यामुळे बरेचदा अॅसेट अॅलोकेशनबद्दल केवळ बोलले जाते आणि प्रत्यक्षात कोणत्याही योजनेविनाच विविध ठिकाणी गुंतवणूक केली जाते.

अॅसेट अॅलोकेशनचे काम कसे होते हे पाहण्यासाठी म्युच्युअल फंडातील अॅसेट अॅलोकेशन योजना पाहता येतील. सध्या बाजारात अॅसेट अॅलोकेशन योजना असलेले पाच फंड हाऊसेस आहेत. हे फंड्स आपल्या गुंतवणुकीचे ध्येय आणि धोका सहन करण्याची क्षमता यानुसार विविध अॅसेट प्रकारांमध्ये गुंतवणूक कशी करावी याबद्दल मदत करतात. अॅसेट अॅलोकेशन फंड हा ओपन एंडेंड फंड असून त्यात गुंतवणुकीतील धोका आणि परतावा यांची योग्य सांगड घालून विविध ठिकाणी गुंतवणूक केली जाते. म्हणजे या फंडमध्ये सुरुवातीला रक्कम कशी गुंतवायची हे ठरवून त्यानंतर कोणत्या फंडांमध्ये � ��ुंतवायला योग्य परतावा मिळेल हे ठरवले जाते. आपल्या गुंतवणुकीतून अॅसेट अॅलोकेशन साध्य करायचे असेल तर अॅसेट अॅलोकेशन फंड्स हा चांगला पर्याय ठरतो. या प्रकारातील म्युच्युअल फंड्स कॉंझर्वेटिव्ह, मॉडरेट आणि अॅग्रेसिव्ह अशा रिक्स प्रोफाईल्सवर आधारित असतात. म्हणजे गुंतवणूकदाराची धोका पत्करण्याची तयारी किती आहे यावर ते अवलंबून असतात. धोका पत्करण्याबरोबरच गुंतवणूकदार सध्या जीवनाच्या कोणत्या टप्प्यावर आहे हेही महत्त्वाचे असते. फ्रॅंकलिन टेंपलटन एएमसीने गुंतवणूकदाराच्या वयावर आधारित योजना आणली आहे. म्हणजे 25 वर्षीय तरुण एफटी इंडिया लाईफ स्टेज फंड 20 या योजनेत पैसे गुंतवू शकतो. या योजनेत 80 टक्के रक्कम इक्विटीमध्ये तर 20 टक्के रक्कम डेट फंडमध्ये गुंतवली जाते. हा पैसा फ्रॅंकलिन इंडिया ब्ल्यू चिप फंड (50 टक्के), फ्रॅंकलिन इंडिया प्रायमा फंड 15 टक्के, टेपलटन इंडिया, ग्रोथ फंड 15 टक्के, टेपलटन इंडिया इन्कम बिल्डर फंड दहा टक्के आणि टेपलटन इंडिया इन्कम फंड दहा टक्के अशी गुंतवणूक केली जाते. लाईफ स्टेज फंडमध्ये गुंतवणूकदाराला एकाच ठिकाणी त्यांच्या सर्व गरजा पूर्ण करणारा पर्याय मिळतो. यामुळे गुंतवणुकीची प्रक्रिया सोपी होते आणि श
ेअर बाजारातील घडामोडींमुळे विस्कळीत होऊ शकणारे फंड अॅलोकेशन लक्ष्याला धरून राहते.

अॅसेट अॅलोकेशन फंडमध्ये गुंतवणूक केल्यामुळे आपल्याला विविध प्रकारच्या फंड्समध्ये एकाच वेळी गुंतवणूक करणे शक्य होते. विविध योजनांचा शोध घेऊन त्यात गुंतवणूक करणे आणि पुन्हा त्यावर नजर ठेवण्याचे श्रमही वाचतात. अॅसेट अॅलोकेशन हा संपत्ती निर्माण करण्याचा खात्रीशीर पर्याय असला तरी त्याचे वेळोवेळी पुनवरावलोकन केले पाहिजे. या पुनरावलोकनाला अॅसेट रिबॅलंसिंग असे म्हटले जाते. असेट रिबॅलंसिंगमुळे आपल्याला वेळोवेळी अधिक नफा मिळवणे शक्य होते. समजा आपण 60 टक्के रक्कम इक्विटीमध्ये आणि 40 टक्के रक्कम डेटमध्ये गुंतवली. एका वर्षानंतर इक्विटीमधील गुंतवणूक दुप्पट झाली आणि डेटमधील गुंतवणुकीवर केवळ दहा टक्केच परतावा मिळाला तर वर्षाच्या शेवटी आपले डेट आणि इक्विटीचे गुणोत्तर 73:27 असे होते. अशा वेळी काही इक्विटी विकून ते गुणोत्तर पुन्हा 60:40 असे करता येते. अशा रिबॅलंसिंगमुळे गुंतवणूक एका प्रकारामधून दुसर्‍या प्रकारात बदलत राहते. अॅसेट अॅलोकेशन फंड्स दर सहा महिन्यांनी करत असतात. एक गुंतवणूकदार म्हणून आपल्याला त्याची काळजी करण्याची गरज राहत नाही. विशेष म्हणजे रिबॅलंसिंगमध्ये गुंतवणूकदारांच्या भावनांचा परिणाम होत नाही. त्यामुळे योग्य ठिकाणीच गुंतवणूक केली जाते.

काही गुंतवणूकदारांना विविध प्रकारचे फंड्स पाहून त्यातील योग्य निवड करण्यासाठी वेळ नसतो. त्यांच्यासाठी असे फंड्स उपयुक्त ठरतात. दीर्घकालीन योजना म्हणत असलेल्या गुंतवणूकदारांसाठी अॅसेट अॅलोकेशन फंड्स सर्वात चांगला पर्याय असतो. यात गुंतवणूक करताना किमान तीन वर्षांचा कालावधी लक्षात ठेवावा. अॅसेट अॅलोकेशन फंड्समध्ये गुंतवणूक करताना गुंतवणूकदाराला दर वर्षी 0.75 टक्के शुल्क भरावे लागते. ही किंमत वैयक्तिक योजनांपेक्षा अधिक असते. कोणतीही गुंतवणूक करताना त्यावर कसा आयकर भरावा लागेल याकडेही लक्ष द्यावे लागते. वैयक्तिक योजनांमध्ये दर सहा महिन्यांनी अॅसेट रिबॅलंसिंग केले तर गुंतवणूकदाराला शॉर्ट टर्म कॅपिटल गेम्स म्हणून कर भरावा लागत. परंतु, हेच अॅसेट अॅलोकेशन फंडमध्ये झाले तर त्यात

हा कर भरावा लागत नाही. या फंडाला डेट फंडासारखाच कर लागू असल्याने तोही फायदा
गुंतवणूकदाराला मिळतो.

असे असले तरी या योजना सर्वांना आवडतात असे नाही. या फंड्समधून मिळणारा परतावा अपेक्षेपेक्षा कमी असतो. या फंड्समध्ये गुंतवणूक करताना बराच वेळ द् यावा लागतो. तेवढाच वेळ वैयक्तिक योजनांसाठी दिला तर गुंतवणूकदाराला अधिक परतावा मिळू शकतो असे अनेकांचे मत आहे. त्यामुळेच अॅसेट अॅलोकेशन फंड हे रेडिमेड सोल्युशन असले तरी इतर फंड्सचा विचार करून वैयक्तिक योजनांमध्ये गुंतवणूक करण्याकडे अनेकांचा कल असतो. शेवटी आपल्या गुंतवणुकीचा निर्णय आपणच घ्यायचा असतो हेच खरे.

— राजेश घोंगते

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..