पावसाळा आला सुरु झाला
वृक्षरोपणाचा संकल्प केला
पंधरा ऑगस्टला शाळेत जमले
बागेत खड्डे बरेच खणले
मुला-मुलींनी रोपे लावली
शिक्षकांनी शाबासकी दिली
नियमीत पाणी घालू लागले
निगा झाडांची राखू लागले
खत-पाणी-वारा
झाडे वाडली भराभरा
सावली मध्ये बसून बाळांनो
अभ्यास चांगला करा करा
झाडांसंगे गाणी गा
वार्यांसंगे धावा-पळा
शरीर संपदा लाभण्यासाठी
पर्यावरणाचे नियम पाळा.
— सौ. सुधा नांदेडकर
Leave a Reply