|| हरि ॐ ||
धन-ऋण घन:शाम भर्तार
बेहोशीने आलिंगिती एकमेकास,
विद्युलतेने फ्लॅश टाकून
कॅमेऱ्यात कैद केले त्यांच्या प्रेमास!
पावसाच्या प्रतीक्षेत कळलेच नाही
त्याचे आगमन झाले कधी?
लांबूनच दिसले मुसळधार बरसताना,
जाणीवेने मन त्यात चिंब भिजले कधी?
ओके बोके डोंगर माथे
रखरखीत दिसती कैसे?
त्याच्या आगमने डोंगरमाथे
हिरवेगार दिसती कैसे?
झाडे, लता, वेलींची मरगळ संपली,
मोरपंखी शालुने नटली सजली!
लता वेलींची कुजबुज धुसपूस,
हळूच वार्याच्या शिळे मधली!
नद्या नाले निर्झर अवखळ
डोंगर, दर्यांतून खळखळ वाहती,
घनदाट अरण्य, काळोख,
नीरव शांतेत सोबती होती!
प्रेमीयुगलांच्या गाठीभेटी
प्रेमाच्या त्या शपथा घेती,
फेसाळलेल्या नदीतीरी
निवांत पाय डुंबवीत बसती!
मनी स्वप्न मधाळ खोडया
मनापंख लाऊन सैरभैर विहारती जोडया,
मनसोक्त नाहू घातले सखीला
चिंबलाजरेपण खुणावत होते त्याला!
जगदीश पटवर्धन, बोरिवली (प.)
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply