पाऊस मला हवा असतो प्रत्येक वर्षी
कारण त्या शिवाय माझ्या एका
नवीन कवितेचा जन्म होणारच नसतो…
पाऊसकोसळण्याची वाट मी चातकासारखी पाहतो
कारण त्या शिवाय मी तिला पावसात भिजताना पाहू शकणार नसतो…
पाऊसात मी भिजवून सतत ओलाचिंब होतो
कारण त्या शिवाय माझ्या कल्पनेला पुन्हा नवीन अंकूर फुटतच नसतो…
पाऊस मुसळ्धार कोसळ्ण्याची वाट पाहत असतो
कारण त्या शिवाय मी पाण्यातून रस्ता काढत चालू शकणार नसतो…
पाऊसात भिजणारा शेतकरी पाहायला मला आवडतो
कारण त्या शिवाय मला सर्वात आनंदी चेहरा पाहायला मिळ्णार नसतो…
कवी – निलेश बामणे ( एन. डी. )
Leave a Reply