गुजरात : बडोदा येथील नीलकंठेश्वर गणपतीची मूर्ती शुभ्र पाषाणाची संगमरवरी असून पुरुषभर उंचीची बसलेली आहे. मंदिराची बांधणी कलापूर्ण असून शिखर पन्नास फूट उंचीचे आहे. बडोद्यातील सिद्धनाथ गणपतीच्या मूर्तीची स्थापना गणेशभक्त नागेश्वर करमरकर ऊर्फ गणपतीबुवा यांनी संवत १९१९ मध्ये केली. या मंदिराचे वैशिष्टय़ म्हणजे विषुववृत्तावर सूर्य असताना सूर्योदयाच्या वेळी सूर्याचे किरण मूर्तीवर पडतात. हे पाहण्याची संधी १९ ते २३ मार्च आणि १९ ते २३ सप्टेंबर या काळात मिळते. मूर्ती शुभ्र संगमरवरी पाषाणाची आहे. कानाजवळ मदस्रावाचे चिन्ह म्हणून काळ्या रेघा दिसतात.
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply