ठाण्यामध्ये बिगरशेती कर (Non Agriculture tax) ठाणे महानगर पालिकेच्या हद्दीत वसूल होतो आहे…हाच कर मुंबई, ठाणे सारख्या मोठ्या शहरात घेतला जाऊ नये या साठी भारतीय जनता पक्ष जेव्हा विरोधी पक्षात होता तेव्हा आघाडी सरकारला धारेवर धरत होता. या मोठ्या शहरात झपाट्याने नागरी कारण झाले .अनेक गावे ,पाडे , महानगर पालिकेच्या हद्दीत आणल्या गेल्या.तिथे मोठ्या प्रमाणात हौसिंग सोसायट्या उभ्या राहिल्या.
महानगर पालिकेने रेडी रेकनर प्रमाणे कर लावायला सुरवात केली.महानगर पालिकेच्या हद्दीत असल्याने पाणी पट्टी ,घरपट्टी सोसायट्या भरू लागल्या .तरीही महाराष्ट्र शासन या सोसायटीच्या जमिनी साठी बिगर शेती कर आकारते.कर रद्द करणे राहिले बाजूला ,या करात प्रचंड वाढ केली आहे. महानगर पालिका एकेठिकाणी शहर म्हणून ज्या भागाला घोषित करते त्याच भागाकडून शासन बिगर शेती कर वसूल करते हे सारासार विचार करता अन्याय कारक आहे.जे या कराला विरोधात असताना विरोध करत होते ते सत्तेत आल्यावर तोंडातून ब्र सुद्धा काढीत नाहीत .ही तर लोकांची शासकीय फसवणूक आहे.परंतु कुठलाही आमदार या बाबत प्रश्न लावून धरत नाही.लोकांनी आता प्रत्तेक वेळी कोर्टात जायचे का ? मग लोकांनी मतदान करून त्यांचे प्रतिनिधी का म्हणून निवडून द्यायचे ???
— चिंतामणी कारखानीस
Leave a Reply