मिलिंद सोमण यांचा जन्म ४ नोव्हेंबर १९६५ रोजी स्कॉटलंडमध्ये झाला. तो पहिली सात वर्षे इंग्लंडमध्ये राहिला. नंतर त्याचे कुटुंब भारतात स्थलांतरित झाले. मिलिंदला कारकीर्दीच्या सुरूवातीला जलतरणपटू व्हायचे होते. त्याने विद्युत अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. व्यायामाने कमावलेली पिळदार शरीरयष्टी लाभलेल्या मिलींदला ठाकरसी फॅब्रिक्सची पहिली जाहिरात मॉडेल म्हणून मिळाली आणि त्याचे आयुष्यच बदलून गेले. गायिका अलिशा चिनॉय हिच्या मेड इन इंडिया या संगीत व्हिडीओत केलेल्या भूमिकेपासून मिलींद प्रकाशझोतात आला. मात्र अभिनेता म्हणून मिलींद कारकिर्द कमीच यशस्वी राहिली. त्याने मराठी ,हिंदी आणि तमिळ चित्रपटातुन अभिनय केला आहे.
‘टफ’ या ब्रँडच्या पादत्राणासाठी मॉडेल मधू सप्रेसोबत त्याने केलेली जाहिरात वादग्रस्त ठरली.
‘प्यार का सुपरहिट फॉर्म्युला’ या चित्रपटाची मिलींद सोमण यांनी केली आहे.गेल्या वर्षी जगातील कठीण ट्रायलॉथॉन स्पर्धांपैकी एक असणाऱ्या झुरीच येथील ट्रायलॉथॉन स्पर्धेत मॉडेल आणि अभिनेता असणाऱ्या मिलिंद सोमणने बाजी मारली आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.विकीपिडीया.
Leave a Reply