मनुष्याच्या आयुर्मानाची मर्यादा लक्षात घेता त्याने भगवंतांची भक्ती जर आत्ताच केली नाही तर त्याला ही संधी पुन्हा कधी प्राप्त होईल की नाही, हे सांगणे कठीण आहे. त्यामुळे मनुष्याने भक्तीमार्गात अभी नही तो कभी नही हे तत्व ध्यानात घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पितांबर चैतन्यप्रभू यांनी केले.इस्कॉनच्या (आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ) मंदीरात आयोजित करण्यात आलेल्या साप्ताहिक सत्संगात उपस्थित कृष्णभक्तांना संबोधित करताना ते पुढे म्हणाले, की पूर्वी मनुष्याचे वय शंभर होते. त्यानुसार २५-२५ वर्षांचे टप्पे करण्यात येऊन धर्म, अर्थ काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ करण्याची शिकवण दिली जायची. मात्र दिवसेंदिवस मनुष्याचे आयुर्मान कमीकमी होऊन ते साठपर्यंत आले. त्यातही हृदयविकार, कॅन्सर आदी असाध्य आजार आले. त्यामुळे मनुष्याला भगवंताला समजून घ्यायला आणि भक्ती करायला फार कमी वेळ उरला. त्यातही मनुष्य भक्तीबाबत फारसा गंभीर न होता निम्मे आयुष्य झोपेतच घालवितो. मानवी जन्माचा उद्देश भगवंताचे आपल्याशी असलेले नाते काय हे ओळखून भक्ती करणे हा आहे. मात्र भलत्याच कार्यात अडकल्याने मनुष्य भक्तीकडे वळत नाही. परिणामी तो सारखा सारखा जन्म-मृत्युच्या फेर्यात अडकतो. हे टाळण्यासाठी सूज्ञ मनुष्याने आत्ताच भगवंतांची भक्ती करायला हवी. यासाठी पाईपलाईन रस्त्यालगतचे कादंबरीनगरी परिसरातील इस्कॉनचे मंदीर सर्वांसाठी खुले आहे. भक्त प्रह्लादसारखी भक्ती करून मनुष्याने स्वतःचा उद्धार करणे गरजेचे आहे. आज अनेक जण ताकिलिक फायद्यासाठी वेगवेगळ्या देवी-देवतांची उपासणा करतात. भगवान श्रीकृष्णांच्या आशिर्वादाने या देवी-देवताही त्यांची भक्ती करणार्याला इच्छित वर देतात. मात्र असे वर तात्कालिक असतात. याऐवजी मनुष्याने केवळ भगवान श्रीकृष्णांनाच शरण गेले पाह ज
.
माझा मोबाईल – ९७६७०९३९३९
— बाळासाहेब शेटे
Leave a Reply