तुझ्या भिंतीवर मारला खिळा
आणि पडला भोक तिला…
त्या भोकातून पाहिले तुला
पण दिसला चंद्र मला…
त्या भोकाला लावला डोळा
तेंव्हा दिसला काळोख मला…
त्या भोकातूनच मग भिडला
तुझ्या डोळ्याला माझा डोळा…
त्या भोकातून पाहिले तुला
तुही मग पाहिले मला…
त्या भोकावर टांगले मला
तुही मग टांगलेस तुला…
त्या भोकातून दिले तुला
तुही दिले प्रेम मला…
त्या भोकाने धोका दिला
एका धक्काने मोकळा झाला…
प्रेमाचा मार्ग भोकात गेला
आपले प्रेम इतिहास झाला…
© कवी – निलेश बामणे (एन.डी.)
Leave a Reply