कवी संजीव यांचे नाव कृष्ण गंगाधर दीक्षित. आपल्या लहानपणी वडिलांचे छत्र हरवलेले संजीव त्यांच्या काकांच्या घरी वाढले. त्यांचा जन्म १२ एप्रिल १९१४ रोजी सोलापुराजवळील ‘वांगी’ गावात झाला.त्यांचे शालेय शिक्षण सोलापुरात झाले. पुढे कलाशिक्षणाकरता त्यांनी मुंबईच्या ‘बाँबे स्कूल ऑफ आर्ट’ या संस्थेत प्रवेश घेतला. तेथून १९३९ साली ते जी.डी. आर्ट पदविका परीक्षा उत्तीर्ण झाले. मा.संजीव व्यवसायाने छायाचित्रकार व मूर्तिकार होते. त्यांनी काही काळ सोलापूर महानगरपालिकेच्या मुलींच्या शाळेत कलाशिक्षकाची नोकरी केली. तात्यासाहेब श्रोत्रिय यांच्या संपर्कात संजीवांना काव्यशास्त्राची, वृत्तछंदांची गोडी लागली. सुरुवातीच्या काळात गणेशोत्सवाच्या मेळ्यांकरता त्यांनी पुष्कळ गाणी लिहिली. १९३०-३२ च्या सुमारास ‘माझा राजबन्सी राणा कोणी धुंडून पहाना’ हे कवी संजीव यांनी लिहिलेले आणि लोकप्रिय गायिका मेहबूबजान हिने गायलेले गाणे अतिशय लोकप्रिय झाले. १९३५ साली ‘दिलरुबा’ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला. १९५०-६० सालांच्या दशकांत संजीवांनी मराठी चित्रपटांची गीतेही लिहिली. मा.संजीव यांचे २८ फेब्रुवारी १९९५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply