रविकिरण मंडळातील एक तेजस्वी किरण समजला जाणारा हा तरुण कवी, पुढे त्यांच्या जीवनग्रंथाचं अवघं एकच पान उलगडलं गेलं. त्यांचा जन्म २७ जून १८७५ रोजी झाला.अवघ्या चोवीस वर्षांचं आयुष्य म्हणजे जाणत्या वयातली केवळ सात ते आठ वर्षच लाभली. पण एवढय़ा अल्पकाळात कवी मा.दत्तांनी जो वारसा मागे ठेवला तो चार पिढय़ांपर्यंत झिरपला. विपुल लेखन केलेल्या, आपल्या नातवंड-पतवंडांच्या सहवासात रमलेल्या किती कवी-लेखकांच्या वाटय़ाला हे भाग्य आलं असावं? काव्यप्रतिभेचा दुर्मीळ वारसा जपणारी चार पिढय़ांची परंपरा लाभलेलं घराणंही दुर्मीळच म्हणायला हवं. कवी मा. दत्त, त्यांचे मा विठ्ठलराव घाटे, त्यांच्या कन्या डॉ. अनुराधा पोतदार आणि त्यांची मुलं.. डॉ. प्रियदर्शन पोतदार आणि यशोधरा पोतदार-साठे. कवी दत्त यांचे शिक्षण अहमदनगर येथील मिशन हायस्कूलमध्ये झाले, महाविद्यालयीन शिक्षण विल्सन कॉलेज, मुंबई आणि ख्रिश्चन कॉलेज, इंदूर येथे झाले. कलकत्ता विद्यापीठातून बी. ए. ही पदवी मिळाल्यावर पुण्यातील नूतन मराठी विद्यालयात शिक्षक म्हणून नोकरीला लागले. कवी दत्त यांच्या बहुसंख्य कविता १८९७ व १८९८ या काळातील आहेत. त्या काव्यरत्नावली, मनोरंजन, सुविचार समागम, बालबोध मेवा, करमणूक इत्यादी नियतकालिकांतून प्रसिद्ध झाल्या. एकूण एक्कावन्न कविता आज उपलब्ध आहेत. त्यांपैकी ४८ कवितांचा संग्रह त्याचे शिक्षणतज्ज्ञ चिरंजीव कवी वि.द. घाटे यांनी इ.स. १९२२ साली दत्तांची कविता या नावाने प्रसिद्ध केला. ’नवे पान’ या डॉ. मा.गो. देशमुख संपादित संग्रहात मात्र त्यांच्या सर्व कविता आहेत.
दत्तात्रेय कोंडो घाटे यांचे १३ मार्च १८९९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply