मानसिक आजारामधे सुरूवातीला झोपेच्या तक्रारी सुरु होतात. त्यामधे झोप लवकर लागत नाही, पहाटे लवकर जाग येते , मधेमधे सारखी जाग येते, निद्रानाश, नाईट मिअर (यामध्ये त्या व्यक्तीस झोप लागते, परंतु भायानक स्वप्ने पडल्यामुळ ती जागी होते )
२) व्यक्तीच्या कामातील तक्रारी वाढतात. ती व्यक्ती मन लावून काम करत नाही. त्याला कामात गोडीच वाटत नाही , मनावर कसलेतरी दडपण आसलेचे जाणवते, ती व्यक्ती कामावर जाण्याची टाळाटाळ करु लागते , ती व्यक्ती कामामधे एकाग्र होऊ शकत नाही. अशा व्यक्तीचे एकाच कामामध्ये लक्ष न लागल्यामुळ कामामध्ये सतत बदल करण्याची प्रवृत्ती आढळते.
३) व्यक्तिगत संबंधामधे बिघाड निर्माण होतो. त्या व्यक्तीचे इतर व्यक्तीशी असलेले परस्पर संबधामधे बदल झालेला आढ़ळतो, ती व्यक्ती दुस-या व्यक्तीना टाळायला लागते, ती व्यक्ती स्वत: एकटी /एकल कोंड़यासारखी राहू लागते.
४) वर्तन – काही रुग्णाचे स्वत:कडे अजिबात लक्ष नसते , त्यांच्या अंगावरील कपडे अस्वच्छ असतात, ते रहातातही अस्वच्छ, अंघोळ करीत नाहीत , दाढ़ी करत नाहीत. त्यामुळे त्यांचे केस व दाढ़ी वाढलेली असते . याउलट काही रुग्ण अतिभडक मेकअप करतात काही रुग्ण उगाचच विचित्र हातवारे करीत राहतात.
५) भावना – काही रुग्णामध्ये भावना नियंत्रित नसतात. काही गोष्टी व्यक्ती बारीक सारीक आठवाणीनी रडतात किवा हसतात .
६) विचार – व्यक्ती चे विचार हे त्याच्या बोलण्यातून समजतात. व्यक्ती खूप बोलकी असते ,बोलत असतानाच एका कल्पने वरून दुसऱ्या कल्पने वर जात असते. त्या व्यक्ती च्या बोलण्यात सुसंगतपणा नसतो, बोलणे असंबधित असते . त्यातून काहीच अर्थ बोध होत नाही.
७) भ्रम /विचारातील बिघाड – भ्रम हा एक विचित्र खोटा आणि असंभाव्य असा विश्वास असतो . या विश्वासालाच सत्य धरून ते चालत असतात. त्यांना खूप समजावून सांगून ,खरे -खोटे याची समजूत घालून सत्याचा पुरावा त्यांचा समोर ठेवला तरी ते मानत नाहीत .
८) आकलन – यांमध्ये रुग्णाला स्थळ, काळ, व व्यक्ती या तीनही गोष्टीचे आकलन नसते. या आजारामध्ये स्मरणशक्ती कमी होते, स्मृतीवर परिणाम झालेला आढळतो.
Fb -गजानन वैद
whats app-7775871809
चिकित्सक सल्ला घ्यावा….
Leave a Reply