१९६० साली प्रदर्शित झालेल्या कन्यादान चित्रपटातील हे गाणे. पंडित ह्रदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरात हे गाणे चित्रित झालं असून हे गीत शब्दबद्ध केले पी. सावळाराम यांनी. संगीत दिग्दर्शन होते वसंत प्रभू यांचे.
मानसीचा चित्रकार तो
तुझे निरंतर चित्र काढतो, चित्र काढतो
भेट पहिली अपुली घडता
निळी मोहिनी नयनी हसता
उडे पापणी किंचित ढळता
गोड कपोली रंग उषेचे, रंग उषेचे भरतो
मम स्पर्शाने तुझी मुग्धता
होत बोलकी तुला न कळता
माझ्याविण ही तुझी चारुता
मावळतीचे सुर्यफुल ते ,सुर्यफुल ते करतो
तुझ्यापरी तव प्रीती सरीता
संगम देखून मागे फिरता
हसरी संध्या रजनी ढळता
नक्षत्रांचा निळा चांदवा,निळा चांदवा झरतो
—
Leave a Reply