<मैखाना</
<टोकदार होत चाललेल्या काळाचे बोथट विचार</
<प्रसव वेदनांनी विव्हळत.. जळत राहणारी</
<संम्भ्रमाच्या कुशीत निजलेली ही भयाण रात्र </
<मेजावरच्या पेल्यात मिसळलेले</
<भविष्य – भूतकाळाचे असंख्य पंखछाटले पक्षी </
<जखमांच्या किनार्याशी पहुडलेल्या </
< ….काही हुल्लड साउल्या </
< ….अल्लड विचार </
<आता आपणच आवरायला हवं</
<आपलं हे जग </
<उद्याही चालायचं आहे मग </
<पावलांना बांधून रस्ते </
<…न दिसणाऱ्या दिशेचा दिशेने</
< ….संध्याकाळ होईपर्यंत </
<या सुंदर थकल्या स्वप्नांची थैली </
< काखोटीला मारून </
<“हा रस्ता अटळ आहे</
<अटळ आहे घाण सारी ” म्हणत </
<पण आज… आत्ताची वेळ</
<फक्त माझ्यापुरतीच …</
< … थोडी सरलेली </
< थोडी उरलेली </
<नकोच घाई </
<गाऊ देत अंगाई</
<जरा या उरातील वादळांसाठी </
<मग्नातून उठू देत भग्नांचेही मिनार</
<सुटू देत ग्रहण उजेडाचे क्षणभर</
< …..निघू नंतर </
<बस्सं….!</
<हा शेवटचाच पेग </
<स्वतःच्या शेवटासाठी </
<बधीराच्या भुंग्यांच रव </
<आजून सुरु व्हायचाय</
<पाहायचाय मला माझाच चेहरा</
<आर्काचा तवंग होऊन फेसाळलेला </
<बुडबुडयांसम उसळलेला </
<गाव दूर …दूर …</
<स्वप्न चूर …चूर..</
<पहाटेचा गंधगार स्वप्नील अरुण</
<डोळे येण्याआधी भरून </
<ही मैफिल …अनोळख्यांची </
<ही सोबत …नसणार्यांची</
<विझलेल्या या ओळी </
< निजलेला मैखाना</
< थोडेसे श्वास</
< आणि न दिसणाऱ्या क्षितीज्यावरून</
< तिने दिलेल्या आर्त हाका</
<मित्रा…..!</
<आता मला निघायलाच हवं…!</
— गजानन मुळे
Leave a Reply