योगा व प्राणायाम न करण्यासाठी दिली जाणारी कारणं…….
1) जॉब हेक्टिक आहे
( कुणाचा नसतो ?)
2) वेळच मिळत नाही
( सर्वांनाच 24 तास मिळतात !)
3) खूप काम असते
( रिकामटेकडा कोण असतो ?)
4) अभ्यास खूप असतो कॉलेजात
( काय दिवे लावणार आहात ?)
5) घरी जाऊन पण काम असते
( आम्ही पण कामं करतो !)
6) लग्न झालं आता
( मग काय नाचू ? सर्वांचीच होतात !)
7) मुलांच्या मागे धावण्यात वेळ जातो
( तेवढा योगा – प्राणायाम, व्यायाम पुरेसा वाटतो का ?)
8) आता कोण बघतंय आमच्याकडे ?
( मग घराबाहेर पडूच नका !)
9) मला गरजच नाही योगा-प्रणायाम, व्यायामाची
( सर्वात मोठा गैरसमज …)
10) हे जिम , व्यायाम योगा-प्रणायाम मोठ्या लोकांची थेरं आहेत
( स्वतःला कमी समजायचंच कशाला ?)
11) योगा प्राणायाम क्लास ची फी परवडत नाही
( घरी करायला किती पैसे लागतात ?)
12) खूप ठरवतो , पण काही ना काही आडवं येतं
( अर्धा एक तास काढता येत नाही स्वतःसाठी ?)
13) घरी आल्यावर आराम करायचा की योगा-प्रणायाम करत बसायचं ?
( एक सिरीयल कमी पाहिलीत तर लगेच जीव जाईल का ?)
हुश्श !!!
यापेक्षा मोठी लिस्ट होईल.
मित्रांनो , कारणं खूप देता येतील. पण आज स्वतःमध्ये गुंतवणूक कराल तर पुढचं आयुष्य निरोगी जगाल. नंतर हा पैसा , मालमत्ता , हुशारी , कशाचाच उपयोग होणार नाहीय. तंदुरुस्त शरीर हीच सर्वात मोठि मालमत्ता आहे तेव्हा आतापासूनच स्वतःची काळजी घ्या.
Leave a Reply