नवीन लेखन...

योगा व प्राणायाम न करण्यासाठी दिली जाणारी कारणं

योगा व प्राणायाम न करण्यासाठी दिली जाणारी कारणं…….

1) जॉब हेक्टिक आहे
( कुणाचा नसतो ?)

2) वेळच मिळत नाही
( सर्वांनाच 24 तास मिळतात !)

3) खूप काम असते
( रिकामटेकडा कोण असतो ?)

4) अभ्यास खूप असतो कॉलेजात
( काय दिवे लावणार आहात ?)

5) घरी जाऊन पण काम असते
( आम्ही पण कामं करतो !)

6) लग्न झालं आता
( मग काय नाचू ? सर्वांचीच होतात !)

7) मुलांच्या मागे धावण्यात वेळ जातो
( तेवढा योगा – प्राणायाम, व्यायाम पुरेसा वाटतो का ?)

8) आता कोण बघतंय आमच्याकडे ?
( मग घराबाहेर पडूच नका !)

9) मला गरजच नाही योगा-प्रणायाम, व्यायामाची
( सर्वात मोठा गैरसमज …)

10) हे जिम , व्यायाम योगा-प्रणायाम मोठ्या लोकांची थेरं आहेत
( स्वतःला कमी समजायचंच कशाला ?)

11) योगा प्राणायाम क्लास ची फी परवडत नाही
( घरी करायला किती पैसे लागतात ?)

12) खूप ठरवतो , पण काही ना काही आडवं येतं
( अर्धा एक तास काढता येत नाही स्वतःसाठी ?)

13) घरी आल्यावर आराम करायचा की योगा-प्रणायाम करत बसायचं ?
( एक सिरीयल कमी पाहिलीत तर लगेच जीव जाईल का ?)

हुश्श !!!
यापेक्षा मोठी लिस्ट होईल.

मित्रांनो , कारणं खूप देता येतील. पण आज स्वतःमध्ये गुंतवणूक कराल तर पुढचं आयुष्य निरोगी जगाल.  नंतर हा पैसा , मालमत्ता , हुशारी , कशाचाच उपयोग होणार नाहीय. तंदुरुस्त शरीर हीच सर्वात मोठि मालमत्ता आहे तेव्हा आतापासूनच स्वतःची काळजी घ्या.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..