काही राजकारणी नेत्यांच जनतेच्या बाबतीतल “नागरिकशास्त्र” हे कच्च असतच…
परंतु निवडणुकीच्यावेळी जातीधर्मांच्या “ईतिहासाची” मांडणी ही जरुर पक्कीच असते….
काही नेत्यांना “मराठीचे” आपणच वारसदार आहोत…. असा भयंकर गैरसमज असतोच.
राजकारणमध्ये भ्रष्टाचार करताना किमान “भुगोल” तरी लक्षात ठेवावा… असही बंधन नाहीच..
निवडणुकीच्या नतंर सत्तेमध्ये येण्यासाठी कोणाशिही व अनेक अमिषे दाखवत सत्ता स्थापन करण्याची यांची “गणिते” नक्कीच जगावेगळी असतातच…
जनकल्याणाच्या हितार्थ (?) भाषण करताना यांची राष्टीयभाषा “हिंदी” नक्कीच कुमकुवत आहे… हेच जाणवते…..
राजकारणातसुध्दा व्यावसायिकपणाच्या व्यवहारासाठी “ईंग्रजीच्या” बाबतीत काही अशिक्षित नेत्यांना शिकलेल्या “P.A” वरतीच अवलंबुन रहावे लागते..
“अर्थशास्त्राच्या” बाबतीतील प्रत्येक नेत्यांचे स्वताःचे जगावेगळेच नवनवीन “सिध्दांत” असतातच…
सत्ताधारी असताना व नतंर विरोधक झाल्यावरच जनतेच्या विकासाविषयी कोणता प्रचंड “केमिकल लोच्या” होतो…. हे अत्याधुनिक “सायन्स” ला देखिल कळणार नाही….
आणि हो.,…
“सामाजिक शास्त्र” यांना फक्त निवडणुकीच्यावेळीच आठवत…. हेच जगातील आठवे आश्चर्य …..
तर असा हा…..
“सध्यस्थितील राजकारण व शाळेतील विषयांची ऊजळणी”
— विवेक जोशी
Leave a Reply