रिक्त प्रेमाचा घट
रिक्त झालीस तू , लुटवूनी प्रेमाचा घट //
भावंडाचे संगोपन
रमवूनी त्यांचे मन
आईच्या कामी मदत देऊन
आनंदिले बालपणी, गीत गावूनी नीट //१//
रिक्त झालीस तू , लुटवूनी प्रेमाचा घट
लक्ष्य संसारी
प्रेम पतीवरी
मुलांची जोपासना करी
संसार सुखाचे प्याले, भरी काठोकांठ //२//
रिक्त झालीस तू , लुटवूनी प्रेमाचा घट
होता मुले मोठी
संसार त्यांचा थाटी
राहुनी त्यांचे पाठी
सुखासाठी त्यांच्या, करी देहकष्ट //३//
रिक्त झालीस तू , लुटवूनी प्रेमाचा घट
ईच्छा उरली नसे मनी
लक्ष्य सारे प्रभू चरणी
सर्वस्वी त्यासी अर्पुनी
विनवी ईश्वारासी, डोळे आता मिट //४//
रिक्त झालीस तू , लुटवूनी प्रेमाचा घट
विवीध-अंगी *** ३६
आपली जीवन दैनंदीनी-
अमेरिकेतील एका पहाणीनुसार वयाची सत्तरी पर्यंत सर्व सामान्य माणसे आपला दैनंदीन वेळ कसा खर्च करतात, हे जाणणे मनोरंजक व माहितीपर ठरेल.
विचारांत घेतलेली साधारण वयोमर्यीदा—– ७० वर्षे
झोप —————— २५ वर्षे
शिक्षण —————- ८ वर्षे
सुट्या/करमणूक ——– ७ वर्षे
विश्रांति/आजार ——– ६ वर्षे
प्रवास/सहली ——– ५ वर्षे
खाणे ——- ४ वर्षे
रचनात्मक कार्यासाठी —- १२ वर्षे
एक मजेदार बाब म्हणचजे, रचनात्मक कार्यासाठी एक वर्ष जर वाढ हवी असेल
तर अर्धा ( 1/2 ) तासाची दैनंदीव झोप कमी करावी लागेल.
— डॉ. भगवान केशवराव नागापूरकर