’घर’ आणि ‘लग्न’ या दोन शब्दांशी ‘चिता’ नावाची गोष्ट जोडूनच येते. आणि माणसाच्या जीवनात या दोन्ही गोष्टींना सहसा
पर्याय नसतो. या दोन गोष्टींबद्दल चिता वाटणं हीसुद्धा एक ‘समाजमान्य’ गोष्ट आहे. त्यामुळेच विवाहसंस्था चालवत असताना
काही प्रमाणात का होईना, पालकांच्या चिता कमी करण्यात आम्हाला मदत करता येते, हा आनंदाचा भाग वाटतो. लग्नाच्या संदर्भात चिता निर्माण करणारे, वर्षानुवर्षे चालत आलेले प्रश्न प्राय: मुलींच्या पालकांना असत आणि त्या प्रश्नांची
सुरुवात ‘मुलगी झाली हो’ या तीन शब्दांपासून होई. आता लग्नासंबंधी चिता ही मुलींच्या पालकांची मक्तेदारी राहिलेली नाही.
मुलांच्या पालकांनाही ‘मुलाचं लग्न’ हा चिंतेचा विषय बनला आहे.
‘चिंता’ या शब्दाचा अर्थ सोपा आहे. चिता म्हणजे न संपणांर्या प्रश्नांची साखळी! आणि या साखळीतला प्रत्येक प्रश्न नवीन प्रश्नाला
जन्म देत असतो. त्यांची जोपर्यंत समाधानकारक उत्तरं सापडत नाहीत, तोपर्यंत माणूस ज्या अस्वस्थतेचा अनुभव घेत राहतो तो
तणाव! लग्नाचं हे ‘टेन्शन’ व्यक्तिपरत्वे वेगवेगळ्या तीव्रतेचं आणि मुदतीचं असतं. पण टेन्शन नाही- असं म्हणणारे लग्नाळू
मुला-मुलींचे पालक कमी!
लग्न केव्हा, कधी, कसं जमणार? योग्य स्थळ मिळेल का? स्थळाची माहिती खरी असेल का? लग्न देण्या-घेण्यावरून अडचणीत
तर येणार नाही? कार्य निर्विघ्नपणे पार पडेल ना? नंतर काही घोटाळा तर होणार नाही? हे लग्नाच्या संबंधात चिता निर्माण
करणारे मूळ प्रश्न आहेत.
लग्न केव्हा करायचं, या प्रश्नापासूनच याची सुरुवात होते. प्रत्येक पालकाच्या मनात या ‘केव्हा’चं एक
उत्तर आधीच ठरलेलं
असतं.
प्रत्येक घरात मुला-मुलींची ‘लग्न’ केव्हा करायची, याची एक परंपरा असते. अपेक्षित वय येऊ घातलं की या चिंतेला सुरुवात
होते. मुला-मुलींच्या मनात ‘आपण लग्न कधी करावं किवा ते साधारण कधी व्हावं’ याबाबत काही स्पष्ट कल्पना असतात.
आई-वडिलांचा ‘केव्हा’ आणि मुला-मुलींचा ‘केव्हा’ मॅच होत नाही. पालक म्हणतात- ‘जेवढं लवकर, तेवढं बरं.’ मुलं म्हणतात,
‘अजून वेळ आलेली नाही.’ या विसंवादाला पालकांचं ठराविक उत्तर असतं- ‘लगेच का लग्न होणार आहे? पाहण्यातच पुष्कळ
दिवस जातात!’ मुला-मुलींचं लग्न ‘करून’ देणं, ही पालकांची संपूर्ण आणि समग्र जबाबदारी असून ती पूर्ण करणं हे गृहस्थाश्रमाचं
इतिकर्तव्य आहे, अशी एक धारणा सर्वत्र आहे. त्यामुळे ही जबाबदारी लवकरात लवकर पूर्ण करण्याची घाई बहुसंख्य पालकांना
झालेली असते. जर अपत्ये जास्त असतील तर त्याचा आणखीनच जास्त ताण पालकांवर येतो. ‘तीनही मुलीच ना! थोरलीचं
झाल्याशिवाय धाकटीचं कसं पाहायचं?’ ही राधिकाच्या वडिलांची प्रतिक्रीया याबाबतीत खूप प्रातिनिधिक आहे.
आई-वडिलांनी प्रयत्न सुरू करणं मुला-मुलींना फारसं आवडणारं नसतं. त्यातून घरात वाद निर्माण होतात. आई-वडिलांचा आदर
म्हणून ती या प्रक्रियेत नाखुशीनेच सहभागी होतात. परंतु नकार द्यायचं अस्त्र मुलांच्या हातात असल्यामुळे पालकांच्या प्रयत्नांना
मुलांचा नकार- असं काहीसं घडतं आणि पालकांची चिता वाढते. मुला-मुलींशी चर्चा न केल्याचे काही तोटे असतात. आई-वडील
आपल्या अपेक्षानुरूप स्थळे निवडतात, मुलांच्या अपेक्षांचा विचारच केला जात नाही. अलीकडेच घडलेलं उदाहरण सांगतो.
मनोरमाच्या आई तिच्यासाठी ‘व्यावसायिक वर नको’ अशा ठाम मताच्या होत्या. आम्ही सुचविलेली व्यावसायिकांची स्थळे त्या
‘बाद’ ठरवत असत. एकदा मनोरमा आमच्या कार्यालयात आली होती. ती संस्कृतमध्ये पीएच. डी. करीत होती. तिला माझ्या
पत्नीनं तिच्या अपेक्षांबद्दल विचारलं. तेव्हा ती म्हणाली, ‘शिक्षण, पैसा या गोष्टी माझ्या दृष्टीने दुय्यम आहेत. मुलात धडाडी हवी,
कर्तृत्व हवं.’ तिचं लग्न तिच्यापेक्षा कमी शिकलेल्या, पण एका धडाडीच्या मुलाशी तिनंच ठरवल्याचं कळलं. पण घरात चर्चा न
झाल्याचे परिणाम असे असतात. परंतु अनेक पालकांना मुला-मुलींची लग्नं ही आपली जबाबदारी वाटत असल्याने मुलांशी चर्चा
करण्याची गरजच त्यांना वाटत नाही. त्यामुळे ही जबाबदारी पूर्ण करण्यासाठी त्यांना योग्य वाटतं ते सर्व काही ते करत
राहतात. काही पालक चार-चार संस्थांत नावं नोंदवतात. जितकी जास्त स्थळे मिळतील तेवढी ‘लग्न’ ठरण्याची संधी ‘अधिक’-
असा तर्कशुद्ध(?) विचार त्यामागे असतो. अशा प्रकारे मिळवलेल्या प्रत्येक स्थळाशी संपर्क साधणं, हे ओघानंच येतं. याबाबतीत
‘जोडे झिजवणं’ ही म्हण प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न असतो. पूर्वी गावं, शहरं छोटी असायची. तेव्हा जोडे झिजवणं शक्य
असायचं. पण आता एका ‘ठिकाणा’कडे जाऊन येण्यात बस, रिक्षाचे पैसे खर्च होतातच, पण वेळ जातो आणि दगदगही काही
कमी नसते. असे दमूनभागून गेलेले मुलीचे पालक त्यांच्या दृष्टीने ‘सोयीच्या’ वेळी त्या ‘ठिकाणा’च्या घरी पोहोचतात खरे, पण
ती वेळ ‘ठिकाणाच्या’ दृष्टीने गैरसोयीची असते आणि मग वधू-पालकाला ‘कटवलं’ जातं. असे कटवण्याचे दोन-तीन अनुभव आले
की मग निराशा येते आणि सगळे वर-पालक ‘वाईटच’ वागतात, या निष्कर्षावर वधू-पालक येऊन पोहोचतात.
दूरसंचार कृपेमुळे
हल्ली ‘जोडे झिजवणे’ऐवजी ‘फोन फिरवणे’ असा
शब्दप्रयोग येऊ घातला आहे. ‘दुनिया मेरी मुठ्ठी में’ असल्यामुळे ठिकाणाचा
फोन नंबर कळताच कधी एकदा बटणं दाबतो, असं वधू-पित्याला होऊन जातं. माझ्याआधी कुणी फोन केला अन् स्थळ हातचं
गेलं तर! सुमित्राताई सांगत होत्या, ‘मुलाची आई असणं म्हणजे किती त्रासाचं- हे आत्ता समजतं आहे. तुमच्या मासिकात
समीरचं नाव आल्यापासून मी टेलिफोन ऑपरेटरच झाली आहे. इतके फोन येतात, की त्यांचा नस्ता त्रास होतो. सकाळी 7।।
ही काय फोन करायची वेळ आहे का? सकाळी माझी स्वयंपाकाची गडबड, तर फोन! खरं तर मुलाची सगळी माहिती अंकात
छापली आहे, अपेक्षा छापल्या आहेत. तरी लोक अपेक्षा न वाचताच फोन करतात. एक पालक तर माझ्यावरच संतापले. म्हणे-
गोरी म्हणजे किती गोरी? एकानं तर विनंती केली- पत्रिका लिहून घ्या, म्हणून!’ फोनची क्रांती ही अशी आहे.
आपला मुलगा/ मुलगी सुखी व्हावी, त्यांचं वैवाहिक जीवन सुखाचं व्हावं म्हणून योग्य ती खबरदारी घ्यावी असं पालकांना
वाटणं हे अगदी नैसर्गिक आहे. त्यात विविध माध्यमांतून फसवणूक, घटस्फोट, व्यसनं याबद्दल पुष्कळ पाहायला/ वाचायला
मिळतं. त्यामुळे पालकांना खूपच असुरक्षित वाटतं. स्थळाची संपूर्ण माहिती मिळवणं तर अवघडच असतं. मिळालेली माहिती
कितपत विश्वासार्ह आहे, याबद्दल मनात शंका येणेही स्वाभाविक असतं. हे सगळे प्रश्न चर्चेने सुटू शकतात, संवादाने
एकमेकांबद्दल आवश्यक ती माहिती मिळू शकते. परंतु या मार्गाने जाण्यात वेळ जातो म्हणून पालक एक सोपा मार्ग
निवडतात-‘पत्रिका.’ पत्रिका जमल्या की विवाह यशस्वी होण्याची शक्यता वाढते- या समजुतीमुळे दिवसेंदिवस पत्तिकेचा आग्रह
वाढला आहे. आणि हा आग्रह इतका दुराग्रही पातळीवर जाऊन पोहोचला आहे की आचार-विचार, जीवनशैली, बौद्धिक अनुरूपता,
समज या गोष्टी दुय्यम ठरून लग्नाची पत्तिका हा प्राथमिक निकष बनत आहे. मात्र, मुला-मुलींना बौद्धिक-भावनिक-शारीरिक
अनुरूपता हाच महत्त्वाचा निकष वाटतो. म्हणूनच पत्रिका * बौद्धिक * भावनिक * शारीरिक अनुरूपता शिवाय पारंपरिक
जातपात- खानदान- गोत्र * रक्तगट इतक्या प्रचंड चाळण्यांतून जीवनसाथी शोधावा लागतो. या चाळण्यांमुळे लग्नं लवकर जमत
नाहीत. त्यामुळे पालकांची चिता वाढत राहते. लग्न जमवणं ही खरं तर किती आनंददायी प्रक्रिया ! पण ती विलक्षण तणावपूर्ण
आणि जाचक वाटू लागते. नैराश्य, अपराधीपणा आणि संताप या नकारात्मक भावना चिंतेच्या सोबतीने येतात आणि अनेक
पालकांचे ब्लडप्रेशर वाढलेलं दिसून येतं. लग्न हा प्रश्न गुंतागुंतीचा आहे, हे खरं. आपण सगळेच धड ना आधुनिक, धड ना
पारंपरिक अशा अर्धवट विचारसरणीच्या प्रवाहात जगत आहोत. आपली समाजस्थितीसुद्धा वैचारिक गोंधळाची आहे, हेही आपण
समजू शकतो. परंतु या गोंधळलेल्या स्थितीत राहून स्वत:चा गोंधळ वाढवायचा की यातून विवेकानं मार्ग काढायचा, हा खरा
प्रश्न आहे.
वर-वधू पालकांची मन:स्थिती मी समजू शकतो. पण त्या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होत नाहीत. वय
वाढलं की सगळ्या क्षेत्रांतलं फक्त आपल्यालाच समजतं, असं काहीजणांना वाटतं. त्यामुळे पालक यात दुसर्यांची मदत घेत
नाहीत.
वास्तविक पालकांची मन:स्थिती समजावून घेऊन त्यांची चिता कमी करण्यासाठी भावनिक आधार देणं- हे काम विवाहसंस्था
करू शकतात. किबहुना लग्न जमेपर्यंत आवश्यक तेवढी मदत करणं, ही विवाहसंस्थेची जबाबदारी असायला हवी. परंतु आमच्या
‘अनुरूप’सारख्या काही संस्थांचा अपवाद वगळता ‘डाटा बेस’ स्थळं उपलब्ध करून देण्याव्यतिरिक्त पालकांना भावनिक आधार
आणि लग्नासंदर्भात पालक-शिक्षणाचे काम होताना दिसत नाही.
— भालचंद्र हादगे
Leave a Reply