१९६८ साली प्रदर्शित झालेल्या एकटी या चित्रपटातील हे गीत. गदिमांच्या लेखणीतून साकार झालेलं हे गीत स्वरबद्ध केलं सुमन कल्याणपूरकर यांनी. या गीताचे संगीतकार होते सुधीर फडके.
लिंबलोण उतरू कशी, असशि दूर लांब तू
इथून दृष्ट काढिते, निमिष एक थांब तू
एकटाच मजसी तू उभ्या जगात लाडका
तूच दुःखसागरी, उभविलीस द्वारका
सर्वभार घेतला, असा समर्थ खांब तू
शीणभाग संपला, तृप्त माय जीवनी
आयु उर्वरीत ते, सरेल ईश चिंतनी
लाभले न जे कुणा, असे सुदैव भोग तू
—
Leave a Reply