नवजात अर्भकाचीही आईस साद सारी,
स्वामी तिन्ही जगाचा-आईविना भिकारी.
एक जीव साकारुनी उपकार थोर केले,
आई ममत्व तुमचे कंणकण असे बहरले.
मायेच्या सावलीत बालपण समर्थ ठरते,
काळाच्या शर्यतीत जीवन हे व्यर्थ ठरते.
गुंफून एकमेका जे जोडीलेस बंध,
राहो सदाच येथे सुखी जीवनाचा गंध.
हे विश्वाच्या विधात्या दे मज असे वरदान,
राहो जगात कायम-आई जो माझा प्राण.
दिवसा प्रहर येती-जीवनात हीच स्वारी,
आई-भगिनी-भार्या हि वात्सल्यमुर्ती नारी.
— आय एस काझी
Leave a Reply