|| हरि ॐ ||
चालली पायवारी पंढरीला
विठुरायाच्या दर्शनाला,
विठुरायाचा नामगजर
होतसे रात्रंदिन !
नाही भूक तहान
नाही झोप विश्रांती,
ठाऊकना उन पाऊस
सर्वत्र पांडुरंग, पांडुरंग !
नाही भेदाभेद कोठे
नाही उच्चनीचा कोणी,
गरीब श्रीमंत सगळे
रंगले पांडूरंगी !
नाही भांडण तंटण
नाही रुसवा भूगवा,
नाही जात पात
मानतो सर्वधर्म समभाव !
दिंडी पोहोचली चंद्रभागा
देह विसावे क्षणभर,
दुरून दर्शन कळसाचे
भाग्य उजळे पायवारीचे !
घेता दर्शन विठ्ठलाचे
झाले सार्थक जन्माचे,
बायका मुले म्हातारेकोतारे
म्हणती वारकरी पायवारीचे !
जगदीश पटवर्धन, बोरिवली (प)
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply