मराठी वाङमयातील कविता, कादंबरी व आत्मचरित्र या तीन वाङमय प्रकाराचा तौलनिक आढावा डॉ.विलास खोले यांनी घेतला आहे.
कवितांविषयी लिहिताना करूणाष्टके, स्वातंत्र्य शाहीर कुंजविहारी, प्रेम गौरव, भिजकीवही, द्रोण, संधिप्रकाशाचे लावण्य, तृतीय पुरुषाचे आगमन सारख्या प्रतिकात्मक काव्याचे सटीप विश्र्लेषण, तर कादंबरी या वाङमयाचा आढावा घेताना श्यामची आई, आस्तिक, बखर एका राजाची, गांधारी, किनारा, होमकुंड, भिन्न, विमु्क्ता यानंतर १९६० नंतरची मराठी कादंबरी व स्त्रीवाद यांचे विवेचन अभ्यासपूर्ण आहे.
आत्मचरित्र या प्रकाराबद्दल लिहिताना डॉ. खोले यांनी आत्मचरित्र व चरित्र, आत्मचरित्राचे आकलन – एक दिशा, आमच्या आयुष्यातील काही आठवणी, करुळचा मुलगा दलित आत्मकथने याविषयी सविस्तर तपशीलासह विवेचन केलेले आहे.
विभ्रम
लेखक : विलास खोले
प्रकाशक : अनघा प्रकाशन, ठाणे पूर्व
मूल्य : ३५०/- रुपये
पाने : ३०१
Leave a Reply