मोहाडी येथे प्रस्तावित असलेल्या एका खाजगी थर्मल पॉवर प्रोजेक्ट या वीज निर्मिती प्रकल्पावर आता ताशोरे ओढणे सुरू झाले आहे. हा थर्मल पॉवर प्रोजेक्ट आजूबाजुंच्या भागांकरिता प्रदूषणासाठी कारणीभूत ठरणार असल्यामुळे या प्रकल्पाच्या विरोधात संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली. भाजपचे आमदार नाना पटोले यांनी याविरोधात रणसिंग फुंकले असून माजी आमदार मधूकर
कुकडे सुध्दा त्यांच्या सोबतीला जुळले आहेत. शेतीवर आधारीत उद्योग या भागात यावे आणि हा भाग प्रदूषणमुक्त रहावा यादृष्टीकोणातून उद्योग या भागात यावेत असा नारा या संघर्ष समितीचा आहे. हा उद्योग केंद्रीय अवजड उद्योगमंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या माध्यमातून होणार आहे. हा प्रकल्प उद्योगपती रेड्डी यांचा असून या प्रकल्पाची कुठलीही वाच्यता होऊ न देता लोकांच्या जमिनी खरेदीचे काम हातात घेतले गेले. बावनथडीच्या सिंचन लाभक्षेत्रातील जमिन या प्रकल्पाकरिता घेतली गेली. जेव्हा की सिंचनाचा लाभ होत असलेल्या ठिकाणी असल्यापध्दतीचा विद्युत निर्मिती प्रकल्प उभा करणे चुकीचे असल्याचा संघर्ष समितीचा आरोप आहे. त्यामुळे आता मोहाडीच्या या थर्मल पॉवर प्रोजेक्टला गालबोट लागण्याची वेळ या माध्यमातून येणार आहे. या पॉवर प्रोजेक्टला तडकाफडकी कुठल्याही कामाकरीता परवानगी दिली जात आहे. नुकतेच पाच दिवसाअगोदर नाना पटोले यांनी हा वीज निर्मिती प्रकल्प कोट्यावधी खर्च करून तयार झालेल्या बावनथडी सिंचन प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात तयार होत असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे या प्रकल्पाशी निगडीत नेते व या वीज निर्मिती प्रकल्पाचे प्रशासन खळबळून जागे झाले होते. काल परवामध्येच राज्य शासनाकडून तडकाफडकी बावनथडीच्या लाभ सिंचन क्षेत्रात तयार होण्याची परवानगी राज्यशासनाने दिली. अशापध्दतीने या वीज निर्मिती प्र
ल्पाला आता राजकीय वर्दस्त मिळालेला आहे. या वीज निर्मिती प्रकल्पाकरिता 500 एकराच्यावर जमीन विकत घेतली गेली आहे. पण आता प्रदूषणाच्या कारणामुळे परत या प्रकल्पाला गालबोट लागतील. भंडाऱ्यातीलच एक मोठा नेता या प्रकरणात दलाली करीत असल्याचा आरोप होतो आहे. आता हा वीज निर्मिती प्रकल्प व्हावा की नाही या दृष्टीकोणातून आजूबाजुच्या लोकांनी सुध्दा आंदोलन घेण्याची भूमिका घेतलेली आहे. कारण या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषणाचा सामना या भागातील लोकांना करावा लागेल. त्यामुळे हा प्रकल्प उभा होऊ देणार नाही असा अट्टाहास आता सुरू झालेला आहे. या प्रकल्पामुळे जी काही हानी होणार आहे त्या दृष्टीकोणातून तुमसरचे माजी आमदार मधुकर कुकडे यांच्यासोबत आमदार नाना पटोले यासोबत अनेक नेते उतरलेले आहेत. या प्रकल्पामुळे मोठे राजकीय वादळ निर्माण होऊ शकतो. भंडाऱ्यातील राजकरण मोहाडीच्या या वीज निर्मिती प्रकल्पामुळे मोठे वादळ निर्माण करू शकतं. आणि त्यादृष्टीकोणातून तशा हालचाली सुध्दा सुरू झालेल्या आहेत. हा प्रकल्प भविष्यात काय सांगून जाईल हे माहित नाही पण सद्यातरी या प्रकल्पातून प्रदूषणाचा धूर निघण्यापूर्वीच आता पासूनच राजकीय,सामाजिक व इतर प्रदूषणांना बळ दिले आहे असेच म्हणता येईल. या प्रकल्पाच्या माध्यमातून कुठकुठल्या नेत्यांनी आपआपले खिसे ओले करून घेतले असल्याचे जाणवते आहे कारण, त्यांचा आवाज या प्रकल्पावरून सद्या प्रकल्पाच्या चिमणीत बंद आहे. खरच या प्रकल्पामुळे आर्थिक उन्नतीला चालना मिळेल का ? वीज तर थेट बाहेरच्या प्रदेशात विकली जाईल. मग इथे का प्रदूषण आणि कोळशापासून तयार होऊन उरलेल्या राखेच्या व्यतीरिक्त अजून काय मिळणार ? आताच या प्रकल्पाच्या संदर्भात विचार मंथन होणे गरजेचे आहे. अन्यथा हा प्रकल्प जिल्ह्यात प्रदूषणा व्यतीरिक्त इतरही प्र
दूषण देऊन जाईल असं आता वाटायला लागलेला आहे.
— श्री.चेतन मुकुंदराव भैरम
Leave a Reply