रस्त्याच्या कडेला पानाच्या टपरीवर उभी राहून एखादी तरूणी सिगारेट ओढत असेल तर तिच्याकडे पाहताना काही पुरूषही स्तब्ध होतात. मी जेंव्हा सुरूवातीला हे असं दृष्य पाहिलं तेंव्हा मला वाटल होत,’ मला दिसलेलं हे दृष्य अपवादात्मक असावं. पण नंतर ते दृष्य मला सतत दिसू लागल आणि त्यानंतर मला त्या बद्दल फारसं आश्चर्य वाटण बंद झाल. म्हणजे माझ्यासाठी आता ते दृष्य नित्याच झाल. आपल्या देशातील स्त्रियांनी खरोखरच सर्वच बाबतीत पुरूषांची बरोबरी साध्य केलेली आहे अगदी व्यसनांच्या आणि व्यसनाधिनतेच्या बाबतीतही अस म्ह्णायला आता वाव आहे. आपल्या देशातील पुरूष आणि व्यसनाधिनतेचा खूपच जवळ्चा संबंध आहे. आज ही रस्त्यात पुरूषासांरखी दारू पिऊन पडलेली बाई दिसत नाही याचा अर्थ आजूनही या बाबतीत स्त्रिया पुरूषांच्या मागे आहेत हे नशिबच म्ह्णावं लागेल. पुर्वी पुरूषांच्या तुलनेत स्त्रियांच आयुष्यमान अधिक होत त्याला त्यांच निर्व्यसनी असणं हे ही एक कारण असावं पण आता व्यसनाधिन स्त्रियांच प्रमाण समाजात झ्पाट्याने वाढू लागल्यामुळे भविष्यात आपल्या देशात स्त्रियांच्या आरोग्या बाबतच्या समस्यांत भर पडण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
— निलेश बामणे
Leave a Reply